फलटण :- मॅग व माऊली फाउंडेशन यांच्यावतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेत वेगवेगळ्या विषयांवर सुमारे ३५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.

त्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा जावलीची इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी कु. राजनंदिनी विठ्ठल पडर हिने ‘माझे स्वप्न’ या विषयावर खुप प्रभावीपणे आपले विचार मांडले व छान विषय सादरीकरण केले होते. सदर वक्तृत्व स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ दि. १ फेब्रुवारी रोजी अनंत मंगल कार्यालय फलटण येथे संपन्न झाला असुन राजनंदिनी पडर हिने प्रथम क्रमांक मिळाल्याबदद्ल तिचा रोख रक्कम, सन्मानपत्र, गौरवचिन्ह व पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी मॅग फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा मॅग फिन्सर्व्हचे चेअरमन अनंता मोहोटकर, माऊली फाउंडेशनचे कार्याध्यक्ष ॲड. विश्वनाथ टाळकुटे, प्रसिद्ध व्याख्याते राजेश मंत्री, मुधोजी काॅलेजचे बाबासाहेब कांबळे, प्रा. नितीन नाळे , जोशी मॅडम यासह मान्यवर उपस्थित होते. राजनंदिनीने मिळविलेल्या या यशाबद्दल तिचे सर्व शिक्षक, जावली ग्रामस्थांसह परिसरातून विशेष अभिनंदन होत आहे.

