‘मॅग फिनसर्व्ह’ आणि ‘इंडिया गोल्ड’ यांची भागीदारी; ग्राहकांना आता मिळणार जलद आणि सोपे गोल्ड लोन

चेअरमन अनिल मोहोटकर यांची माहिती; मोबाईल ॲपद्वारे कर्ज अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध होणार

फलटण प्रतिनीधी :- गोल्ड लोन क्षेत्रात कार्यरत असलेली कंपनी, मॅग फिनसर्व्ह कंपनी लिमिटेडने देशातील आघाडीची फिनटेक कंपनी ‘इंडिया गोल्ड’ सोबत महत्त्वपूर्ण भागीदारी करार केला असल्याची माहिती मॅग फिनसर्व्हचे चेअरमन अनिल मोहोटकर यांनी दिली आहे.

या करारामुळे ग्राहकांना आता मोबाईल ॲपच्या माध्यमातून अत्यंत जलद आणि पारदर्शक पद्धतीने गोल्ड लोन मिळवणे शक्य होणार आहे.या नवीन भागीदारीनुसार, ग्राहक ‘इंडिया गोल्ड’ या डिजिटल प्लॅटफॉर्मवरून गोल्ड लोनसाठी अर्ज करू शकतील आणि त्या कर्जाचे वितरण ‘मॅग फिनसर्व्ह’ मार्फत केले जाणार आहे.या सहकार्याबद्दल बोलताना, मॅग फिनसर्व्हचे चेअरमन अनिल मोहोटकर म्हणाले, “ग्रामीण भागात आर्थिक सशक्तीकरण करण्यासाठी ही भागीदारी उपयुक्त ठरेल.

ग्राहकांना पारदर्शक दरात, विश्वासार्हतेने आणि कमी वेळेत गोल्ड लोन मिळेल.” ‘इंडिया गोल्ड’च्या प्रतिनिधींनी सांगितले की, “मॅग फिनसर्व्ह सारख्या अनुभवी NBFC बरोबर काम करण्यामुळे आम्ही महाराष्ट्रातील आणि इतर राज्यांतील ग्राहकांपर्यंत आमच्या सेवा आणखी प्रभावीपणे पोहोचवू.

”ग्राहकांना मिळणारे फायदे:मोबाईल ॲपद्वारे सोपी अर्ज प्रक्रिया जलद कर्ज वितरण आकर्षक व्याज दर सुरक्षित व पारदर्शक प्रक्रियामॅग फिनसर्व्ह कंपनी सध्या महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये कार्यरत असून, या नवीन डिजिटल भागीदारीमुळे कंपनीच्या कार्यक्षेत्रात आणखी विस्तार होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!