सिंधुदुर्ग :- ३ ते ६ डिसेंबर दरम्यान ‘फेंगल’ चक्रीवादळामुळे कोकणात पाऊस पडण्याची शक्यतासिंधुदुर्ग: ‘फेंगल’ चक्रीवादळाचा कोकणातही परिणाम जाणवत असून हवामान विभागाच्या माहितीनुसार दक्षिण कोकणात ३ ते ६ डिसेंबर दरम्यान पाऊस पाडण्याची शक्यता आहे. कोकणासह गोव्यात देखील पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आल्याने आंबा, काजू उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत.
सध्या ‘फेंगल’ चक्रीवादळामुळे हवामानात बदल होऊन दमट हवामान झालं आहे. तर दोन दिवसापूर्वी तापामनात कमालीची घट झाली होती. मात्र आता तापमानात वाढ होत असल्याने तळकोकणातून थंडी गायब झाली आहे. ऐन हिवाळ्यात तापमानात वाढ होऊन दमट वातावरण निर्माण झाले आहे.