थंडीचा जोर राज्यात कमी होणार, राज्यात पावसाचीही शक्यता

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढला होता. मात्र, आता थंडीचा जोर कमी होणार असून राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.फेंगल वादळ तामिळनाडूच्या किनाऱ्यावर धडकले आहे. या चक्रीवादळाच्या परिणामी राज्यातील काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या फेंगल वादळामुळे थंडीची तीव्रता कमी होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले.

मुंबईसह राज्यभरातील थंडी काहीशी कमी होणार आहे.मागील आठवडाभरापासून मुंबईसह राज्यभरात किमान तापमानाचा पारा घसरला होता. मात्र, आता तापमानाचा पारा वाढणार आहे. दक्षिण भारतात आलेल्या फेंगल चक्री वादळामुळे पश्चिम, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत हवामान ढगाळ राहणार असून हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. येत्या काही दिवसात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. चक्रीवादळामुळे आर्दता वाढल्याने तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडीची तीव्रता कमी होणार आहे.बंगालच्या उपसागरात फेंगल चक्रीवादळाची निर्मिती झाली. फेंगल चक्रीवादळ शनिवारी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास तामिळनाडूच्या किनारपट्टीवर धडकले. या चक्रीवादळाच्या परिणामी तामिळनाडूचा उत्तर भाग आणि पुद्दुचेरीमध्ये शनिवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.

error: Content is protected !!