महायुती सरकारचा आझाद मैदानावर शपथविधीः ५ डिसेंबर रोजी शपथविधी सोहळा पार पडणार

मुंबई:- भाजपाने सत्ता स्थापनेचा आणि शपथविधीचा कार्यक्रम आज जाहिर केला असून या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्याची घोषणा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात एक व्हिडीओ आणि ट्विटरवर पोस्ट करत महायुती सरकारचा शपथविधी होणार असल्याची माहिती दिली.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ५ डिसेंबर रोजी महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. तसेच हा कार्यक्रम ५ डिसेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता सीएसएमटी समोरील आझाद मैदानावर पार पडणार असल्याचेही यावेळी सांगितले.तसेच पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, पुढील दोन दिवसात केंद्रातील दोन निरिक्षक मुंबईत येणार असून त्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय घेण्यात येईल. आणि गटनेता निवड जाहिर करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगितले.

error: Content is protected !!