अजय संकपाळ, क्राईम ब्युरो चीप, महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क
वाई:-मेढा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंधारी (मेढा) येथे झालेल्या खून प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने आरोपींना ७ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.सदरच्या खून प्रकरणी मेढा पोलीस यांनी उत्कृष्ट तपास करून खुनाचा छडा लावला आहे.

मेढा पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २/१/२०२५ रोजी मेढा पोलीस ठाण्याच्या हद्दीत संजय गणपत शेलार, (रा. अंधारी ता. जावली, जि. सातारा) याचे प्रेत आढळून आले होते त्यानुसार अकस्मात मयत म्हणून मेढा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती परंतू मयताची पत्नी रसिका संजय शेलार यांनी मेढा पोलीस ठाणे येथे आपल्या पतीचा घातपात झाल्याचे सांगितल्यानंतर तसा गुन्हा नोंद करुन पोलिसांकडून तपास करण्यात आला.
सीसीटीव्ही फुटेज व मोबाईल सीडीआरचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले असता त्यावरून संजय शेलार याचा खुन करणारा आरोपी रामचंद्र तुकाराम दुबळे याला पोलिसांनी दिनांक १६/१/२०२५ रोजी अटक केली. पोलीस कोठडीत असताना आरोपी रामचंद्र तुकाराम दुबळे याने अरुण बाजीराव कापसे याचे सांगण्यावरून संजय शेलार याचा खुन केला आहे अशी कबुली दिली. संजय शेलार याचा खुन करण्यासाठी अरुण कापसे, रामचंद्र दुबले व विकास सावंत यांनी मिळून खुनाचा कट रचला होता असे तपासात निष्पन्न झाले आहे.

त्यावरून दिनांक १८/१/२०२५ रोजी विकास अवधुत सावंत (वय ३५ वर्षे, व्यवसाय-बाऊन्सर, रा. आगलावेवाडी ता. जावली जि. सातारा) याला अटक करण्यात आली. त्यानंतर गुन्ह्याचा तपास पोलीस अधिक्षक यांच्या आदेशाने जितेंद्र शहाणे, पोलीस निरीक्षक यांचेकडे वर्ग करण्यात आला होता. त्यांनी तात्काळ चार पोलीस पथके नेमुन गुन्ह्यातील मुख्य आरोपी असणारा अरुण बाजीराव कापसे याचा वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेवुन त्यास मिरज येथुन अटक करण्यात आली.
तसेच मुख्य सुत्रधार आरोपी अरुण बाजीराव कापसे यास पळून जाणेसाठी मदत करणारा अजिंक्य गवळी व लपण्यासाठी आश्रय देणारा प्रशांत शिंत्रे यांनाही दिनांक २२/१/२०२५ रोजी अटक करण्यात आली असून सदर आरोपींना रिमांड कामी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मेढा यांच्या समक्ष हजर केले असता दिनांक २८/१/२०२५ रोजीपर्यंत ७ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.या गुन्ह्यात आतापर्यंत अरूण बाजीराव कापसे (वय ५६ वर्षे, रा. माळ्याचीवाडी ता.जि. सातारा), रामचंद्र तुकाराम दुबळे, (वय ३७ वर्षे, रा. मतकर कॉलणी, शाहुपुरी ता.जि. सातारा), विकास अवधुत सावंत (वय ३५ वर्ष, रा. ११३, कासाबिल्डींग, मोळाचा ओढा ता. जि. सातारा) अजिंक्य विजय गवळी, (वय-३६वर्षे, रा.शनिवारपेठ नागोबा कट्टा मिरज, ता. मिरज, जि. सांगली), प्रशांत मधुकर शिंत्रे, (वय-३२वर्षे, रा.मु.पो. बेळंकी, ता. मिरज जि. सांगली) यांना अटक करण्यात आली आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास जितेंद्र शहाणे पोलीस निरीक्षक हे करीत आहेत.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील पो.नि. अरुण देवकर, स्था.गु.शा. सातारा, पो.नि. जितेंद्र शहाणे, सपोनि अश्विनी पाटील, सपोनि अमोल गवळी, पोउपनि पांगारे, पोउपनि शिंगाडे, पोउपनि सुधीर वाळुंज, तसेच स्था.गु.शा., मेढा व वाई पो.स्टे. कडील पोलीस अंमलदार यांनी कारवाई केली आहे. सदर कामगिरीबाबत पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांनी सर्व अधिकारी अंमलदार यांचे अभिनंदन केले.