महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क
फलटण : महावितरणच्या सात वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने ९ ते ११ ऑक्टोबरपर्यंत संप सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असून महावितरण ठेकेदारांचा यांनी या संपला छुपा विरोध केला आहे. काही ठेकेदार व त्यांचे कामगार संपाला नावालाच पाठिंबा देत आहेत आणि पडद्यामागून फलटण महावितरण विभागीय कार्यालयातील भागात खंडित होणारा वीजपुरवठा पूर्ववत करत आहेत.
महावितरणच्या सुरू असलेल्या संपामुळे राज्यात वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ९ ते ११ ऑक्टोबरपर्यंत संपाचा निर्णय कायम ठेवला आहे. महावितरण, महापारेषण, महानिर्मिती या तिन्ही कंपन्यांमधील कामांच्या खाजगीकरणा विरोधात ७२ तासांसाठी राज्यव्यापी संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एकीकडे फलटण महावितरण विभागीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी या संपात सहभागी आहेत तर दुसरीकडे फलटण विभागीय कार्यालयातील काही ठेकेदार व त्यांचे कामगार वरिष्ठ अधिकाऱ्यांना खुश करण्यासाठी ज्या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या अभावी वीज पुरवठा खंडित होत आहे त्या ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत करत आहेत.
एक प्रकारे काही ठेकेदार या पुकारलेल्या संपास जाहीर पाठिंबा देत आहेत तर दुसरीकडे या संपाचा परिणाम जाणवणार नाही व अधिकारी खुश होतील या हेतूने खंडित वीज पुरवठा पूर्ववत करत आहेत. सदरच्या ठेकेदारांच्या दुटप्पी भूमिकेमुळे अनेक संघटनेतील अधिकारी व कर्मचारी यांनी नाराजी व्यक्त केली असून येणाऱ्या काळात अशा ठेकेदारांवर वक्रदृष्टी ठेवण्याचा निर्णय काही संघटना घेणार असल्याचे समजते.संपूर्ण महाराष्ट्रात एकजुटीने सात कर्मचारी संघटनांनी खासगीकरण आणि पुनर्रचनेच्या विरोधात संप सुरू आहे.
महावितरण अधिकारी व कर्मचारी यांनी संपूर्ण ताकद ही पणाला लावत खाजगीकरण व इतर मागण्या करता विरोध केला असताना फलटण विभागीय कार्यालयात अनेक ठेकेदार व त्यांचे कामगार अधिकाऱ्यांना खुश करण्यासाठी ठाण मांडून बसले आहेत. अधिकाऱ्यांचा आदेश मिळतात संपाचा कोणताही परिणाम ग्राहकांना जाणवणार नाही याची दक्षता हे ठेकेदावर त्यांचे कामगार घेत आहेत.फलटण महावितरण विभागीय कार्यालयाच्या सर्व उपविभागात संपामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास घरगुती, शेती, उद्योग आणि रुग्णालयांना त्रास होऊ शकतो. पाणीपुरवठा पंप आणि आपत्कालीन सेवा प्रभावित होण्याची शक्यता असल्याने ते अधिकाऱ्यांचा आदेश मिळतात वीजपुरवठा पूर्ववत करत आहेत.
दुटप्पी भूमिकेत काही ठेकेदार व कर्मचारी संघटनेला एक प्रकारे संपाला विरोध करत असल्याचे दिसत आहे. “खायचे दात वेगळे व दाखवायचे दात वेगळे” असा प्रकार अशा ठेकेदार व त्यांच्या कामगाराकडून सुरू असून पुढील काळात या अशा ठेकेदार व त्यांच्या कामगारांवर सर्व संघटनांनी एकत्र येत बहिष्कार टाकण्याची आवश्यकता आहे. जोपर्यंत सरकारवर संपाचा दबाव येत नाही तोपर्यंत सरकार संघटनाच्या मागण्या मान्य करणार नसल्याने सरकारवर वीजपुरवठा खंडित झाल्याने दबाव येणार असल्याचे चित्र आहे परंतु काही ठेकेदार व त्यांचे कर्मचारी पुढे पुढे करण्यात पटाईत असल्याने अशा ठेकेदार व कामगार मुळे संपाचा दबाव कमी होत असल्याचे चित्र दिसत आहे.
महावितरणच्या सात वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने संपाच्या काळात जाणीवपूर्वक संपात पूर्णपणे पाठिंबा न देता पडद्यामागून मदत करणाऱ्या ठेकेदार व त्यांच्या कामगारांना चांगला इंगा दाखविण्याची आवश्यकता आहे. येणाऱ्या काळात असाच प्रकार सुरू राहिलास ठेकेदार व त्यांच्या कामगाराची मक्तेदारी महावितरण मध्ये कायम राहणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.महावितरणच्या सात वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समिती पुढील काळात अशा ठेकेदार व त्यांच्या कामगारांवर काय कारवाई करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

