उमेदवारी अर्जाची माहिती न देताच निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सोडला कक्ष, दाखल अर्जाची गुप्तता ?

फलटण:- फलटण नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या दिवशी चांगलीच लगबग वाढली आजच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेच जोर वाढला असताना. आज दिनांक १६ रोजी नगराध्यक्षपदासह १३ प्रभागांमधील नगरसेवकपदासाठी अनेक उमेदवारांनी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज दाखल केले. परंतु रात्री ७ वाजेपर्यंत दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जाची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार डॉ. अभिजित जाधव आणि मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी जाहीर केली नाही.

आज दिनांक १६ रोजी रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत दाखल करण्यात आलेल्या अर्जाची माहिती जाहीर करण्याची जबाबदारी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची असताना रात्री ७ वाजता माहिती निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी हे दाखल अर्जाची माहिती न देता निवडणूक कक्षात आढळून आले नाहीत.याबाबत अधिक माहिती घेतली असता निवडणूक कक्षातील निवडणूक नेमणूक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांना भेटा ते यादी देतील असे सांगून माहिती देण्याचे टाळले.

एकंदरीतच निवडणूक आयोगाच्या आदेशाला निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कचऱ्याची टोपली दाखवली आहे.निवडणूक आयोगाकडून दैनंदिन दाखल अर्जाची माहिती त्याच दिवशी प्रसिद्धीकरीता जाहीर करण्याची सूचना असताना फलटण नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने दाखल उमेदवारी अर्जांची माहिती देण्यासाठी गोपनीता पाळली जात असल्याची बाब दिसून आली. एकंदरीतच निवडणुकीच्या अनुषंगाने सुरुवातीच्या काळात निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कामकाजावर संशय व्यक्त करण्याची वेळ आली आहे.

आज रात्री ७ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या रिकाम्या खुर्च्या पाहून अनेक वृत्तपत्र प्रतिनिधी माहिती न मिळाल्याने रिकाम्या हाताने निघून गेले. वृत्तपत्र प्रतिनिधी करिता माहिती देण्यासाठी कोणताही कर्मचारी नेमणूक करण्यात आली नसून माहिती कक्ष सुरू करण्यात आला नसल्याने पुढील निवडणूक प्रक्रिया कशी पार पडेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!