आपत्ती व्यवस्थापनात मुख्याधिकारी यांनी नगरपरिषद सोडलीच कशी ? : समशेरसिंह नाईक निंबाळकर

फलटण प्रतिनिधी: फलटण नगरपरिषदे मध्ये मुख्याधिकारी व इतर अधिकारी थांबत नाहीत, अधिकारी फोन उचलत नाहीत, अश्या विविध कारणांच्यावरुन फलटण नगर परिषद माजी विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर व माजी नगरसेवक अनुप शहा यांनी आज फलटण नगरपरिषदेच्या कार्यालयात जात नगरपरिषद धारेवर धरली होती.आपत्ती व्यवस्थापनात मुख्याधिकारी नगरपरिषद सोडलीच कशी असा जाब यावेळी समशेरसिंह यांनी विचारला.

Oplus_16908288

फलटण नगर परिषदेच्या हद्दीमध्ये बाणगंगा नदीला पुर आल्याने ना भुतो, ना भविष्यती परिस्थिती निर्माण झाली आहे. कालच जिल्हाधिकारी यांनी सातारा जिल्ह्यामध्ये सर्वाधिक नुकसान हे फलटणला झाले असल्याची माहिती दिली आहे, अश्या आपत्तीच्या काळामध्ये फलटण नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासकांनी मुख्यालय असलेली नगरपरिषद सोडलीच कशी ? असा सवाल सुध्दा समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला आहे.

मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी तीन कोटीची कामे जर कमिशन साठी रिटेंडर केली नसती तर आजची पूर परिस्थिती मंगळवार पेठ व ईतर भागात उद्भवली नसती गेली काही दिवस कार्यालयात हजर नसल्याने पुरानंतर शहरातील साफ सफाई, औषध फवारणी, पुरात वाहत आलेला कचरा उचण्याबाबत योग्य कार्यवाही होत नाही, मुख्याधिकारी यांनी कोणाच्या आदेशाने कार्यालय सोडले याबाबत चौकशी करण्यात यावी.

मुख्याधिकारी यांच्या कामकाजाच्या चुकीच्या पद्धतीने फलटण शहरात पूरस्थिती गंभीर बनली आहे. मुख्याधिकारी यांना कोणत्याही परिस्थितीचे भान नसल्याने शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. असे समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.एकीकडे प्रशासन जलद काम करत असल्याचे भासवत आहे अश्यामध्येच समशेरसिंह नाईक निंबाळकर व अनुप शहा या दोघांनीही नगरपरिषद प्रशासनाचे धिंडवडे काढल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.

अनुप शहांकडुन सीओंच्या रिकाम्या खुर्चीला
पुष्पहार

फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक हे आपत्ती काळामध्ये सुध्दा मुख्यालय सोडुन गेले असल्याच्या कारणावरुन फलटण नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते अनुप शहा यांनी फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक यांच्या रिकाम्या खुर्चीला पुष्पहार अर्पण केला व मुख्याध्याकारी निखिल मोरे यांच्या नावाने बोंब मारली.

सीसीटीव्ही कॅमेरा टेंडर चे काय झाले ?

मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी केली सात महिन्यापूर्वी फलटण शहरातील सीसीटीव्हीचे टेंडर दिले होते सदरचे टेंडर काम करण्याचा कालावधी संपूर्ण ही अद्याप शहरात शिष्टीचे काम करण्यात आलेला असल्याने तसेच सीसीटीव्ही ठेकेदाराला मुख्याधिकारी निखिल मोरे पाठीशी घालत असल्याने शहरातील विकासाची वाट लागली आहे असे अनुप शहांकडुन सांगण्यात आले.

error: Content is protected !!