फलटण प्रतिनिधी:- दिनांक 28 जून 2025 रोजी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांची पालखी फलटण मध्ये दाखल झाली. तेव्हा “डसऱ्याक असोसिएशन रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन” यांचेमार्फत वारकऱ्यांना माऊलींना मोफत चहा, पाणी व बिस्कीट पुडे वाटप करण्यात आले.

हा आयोजित कार्यक्रम महाराष्ट्रातील काही दानशूर व्यक्तींच्या देणग्यांमुळे यशस्वी झाला त्या सर्वच देणगीदारांचे तसेच ज्या ज्या व्यक्तींमुळे हा कार्यक्रम उत्कृष्ट रित्या माऊलींच्या नामाच्या गजरात भक्तिमय वातावरणात सकाळी 9:30 ते सायंकाळी 7 पर्यंत यशस्वीरित्या संपन्न झाला. त्या सर्वच व्यक्तींचे संस्थेचे विश्वस्त ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात व डॉ. महेशकुमार धोंडीराम खरात यांनी आभार मानले.