निंभोरे गावात आढळला मृतावस्थेत बिबट्या

फलटण:- निंभोरे ता फलटण गावाच्या हद्दीत पुणे पंढरपूर पालखी महामार्गलगत असणाऱ्या गव्हाच्या शेतात एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला आहे. वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून बिबट्याचा मृत्यू कशामुळे झाला याचा अधिक तपास ते करत आहेत.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, निंभोरे गावालगत असणाऱ्या अष्टविनायक हॉटेलच्या समोरील बाजूस गव्हाच्या शेतात आज दिनांक २६ रोजी दुपारी नागरिकांना बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला त्यांनी ही बाब फलटण वनविभागाला कळवली वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून वनविभागाने मृत बिबट्याचे शव ताब्यात घेतले असून बिबट्याचा मृत्यू नक्की कशामुळे याचा तपास करीत आहेत घटनास्थळी बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. शिवविच्छेदनानंतर बिबट्याचा मृत्यू कोणत्या कारणाने झाला याची अधिक माहिती होईल असे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.

फलटण तालुक्यात निंबळक, मुंजवडी ,गिरवी या परिसरात बिबट्या दिसल्याची अनेक प्रकरणे समोर आली होती अनेक वेळा वन विभागाच्या कॅमेरात देखील बिबट्या कैद झाला होता मात्र पुणे पंढरपूर महामार्गावर बिबट्या मृत अवस्थेत आढळल्याने परिसरातील नागरिकांच्यात घबराट पसरली असून बिबट्याचे वास्तव्य या भागात असेल तर नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. वन विभागाचे अधिकारी अधिक तपास करत आहेत.

error: Content is protected !!