वाई:- रविराज जोशी व सुहास लक्ष्मण वाकडे यांच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाने टाच आणली असून थापा पॉईंट सर्व्हे नं 10 मध्ये करण्यात आलेला बेकायदेशीर ताबा प्रशासनाने हटवला आहे.

सुप्रीम कोर्टापर्यंत अख्या गावाची मालकी सांगत फिरणारे सुहास वाकडे व रविराज जोशी यांनी गैर फेरफार करून थापा पॉईंट सर्व्हे नं 10 मध्ये केदारेश्वर देवस्थानच्या समोर वहिवाटदार म्हणून स्वतःचे नाव लावले. महसूल मंत्र्याकडे दावा प्रलंबित असताना सुद्धा गावच्या जमिनी स्वतःच्या आहे असं भासवून अनेक लोकांकडून पैसे उकळण्याचा प्रकार केला. त्यांच्या विरुद्ध पोलीसांनी गुन्हा दाखल केली आहे तसेच महाबळेश्वर कोर्टाने पोलीस चौकशीचे आदेश दिले आहेत.

थापा सव्हे नं 10 ही संपूर्ण पाचगणीमध्ये मोक्याची जागा. ह्या 18 एकर जागेवर वाकडे यांनी गैर मार्गाने कब्जा केला आहे. त्या विरुध्द वाई उपविभागीय अधिकारी यांनी 2018 रोजी जागा सील करण्याचे आदेश दिले होते. वकील जोशी यांचे गैरव्यवहार दिवसेंदिवस वाढतच होते. गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी सातारा यांना निवेदन देऊन कारवाई करायची मागणी केली असता प्रशासन त्वरित अक्शन मोड वर आली. शनिवारी पहाटे 6 ला दांडेघरची यात्रा असतानाच प्रशासन 5 जेसीबी 2 क्रेन घेऊन जागेवर पोहोचली व कारवाईला सुरुवात केली. कारवाईची बातमी भागात वणव्यासारखी पसरली व जल्लोष सुरु झाला.
केदारेश्वरची आरती करून दांडेघर ग्रामस्थानी फटाके फोडून प्रशासनाचे आभार मानले. यापुढे सर्व्हे नं 10 वर कोणत्याही व्यवसायास परवानगी देऊ नये असा आदेश जिल्हाधिकारी सातारा यांनी दिला आहे.चौकट – हायकोर्ट व सुप्रीम कोर्टाचे खोटे पेपर दाखवून जोशी वकील, वाकडे ग्रामस्थांना वेठीस धरत व पर्यटन संचालनालय पुणे त्यांना साथ देत होती, त्या कागदाला प्रशासनाने केराची टोपली दाखवली आहे.