जावलीची राजनंदिनी पडर सलग दुसऱ्या वर्षीही वक्तृत्व स्पर्धेत सातारा जिल्ह्यात प्रथम

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क

फलटण:- सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कर्णेवाडी (आंदरूड) केंद्र जावली ता. फलटण येथील इ. ४ थीची विद्यार्थिनी कु. राजनंदिनी विठ्ठल पडर हिने सलग दुसऱ्या वर्षी सातारा जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा जिल्हा परिषदेच्या श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल येथे आपल्या प्राथमिक शिक्षणाची सुरूवात केली. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागामार्फत दरवर्षी हा दिवस ७ नोव्हेंबर रोजी विद्यार्थी प्रवेश दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात येतात.डाॅ. बाबासाहेब आंबेडकर एक महान विचारवंत या विषयावर बोलताना अत्यंत ओघवत्या शैलीत मनोगत व्यक्त करत तिने हे यश संपादन केले आहे.

कु. राजनंदिनी हि उत्तम वक्ता असून संपूर्ण महाराष्ट्रभर विविध विषयांवर बोलताना अनेक शासकीय व खाजगी वक्तृत्व स्पर्धांमध्ये तिने यश मिळवले आहे.तिच्या या यशाबद्दल सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, सातारा जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अनिस नायकवडी,फलटण पंचायत समितीतीचे गटशिक्षणाधिकारी शरणय्या मठपती, पंचायत समितीचे विस्ताराधिकारी दारासिंग निकाळजे, जावली केंद्राच्या केंद्रप्रमुख संगिता मगर, मुख्याध्यापक शामराव निंबाळकर, वर्गशिक्षक अविनाश सुतार यांच्यासह आंदरूड, जावली केंद्रातील सर्व शिक्षक, पालक, ग्रामस्थांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तिचे अभिनंदन व कौतुक केले आहे.

error: Content is protected !!