फलटण : खंडाळा तालुक्यातील पाडेगाव येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न, फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित, कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषीदूतांनी ग्रामीण जागरुकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२४-२५ कार्यक्रमांतर्गत कृषीदूतांनी जागतिक मृदा दिन साजरा केला.

संपूर्ण देशामध्ये जागतिक मृदा दीन म्हणून ५ डिसेंबर साजरा केला जातो या कार्यक्रमाचे औचित्य साधून पाडेगाव ता. खंडाळा येथे जागतिक मृदा दिन आयोजित केला होता ५ डिसेंबर जागतिक मृदा दिनानिमित्त पाडेगाव येथे कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ वैभव गायकवाड सर यांचं मार्गदर्शन शेतकऱ्यांना लाभले. शेतकऱ्यांना जमिनीचे आरोग्य कसे राखता येईल तसेच माती समस्या आणि सुधारणे यावर ही मार्गदर्शन केले. यावेळी कृषी दुतांनी सेंद्रिय शेतीचा अवलंब केल्यास जमीन चे आरोग्य चांगले रहण्यास मदत होणार असून विषमुक्त शेतमाल तयार करण्यासाठी यावेळी शेतकऱ्यांना अहवान केले.
या कार्यक्रमात कृषी दुतांनी नैसर्गिक शेती गट योजना मध्ये शेतकऱ्यानी सहभागी होऊन सेंद्रिय शेती च्या माध्यमातून सेंद्रिय शेती मला उत्पादन करणे बाबत आव्हान केले. पुढच्या पिढीला सुपीक जमीन देण्यासाठी आणि वाढत्या लोकसंख्येच्या अन्नधान्याची गरज भागवण्यासाठी जमीन सुपीकता असणे आवश्यक आहे त्यामुळे माती परीक्षणाचे महत्व व माती परीक्षणानुसार खताचा संतुलित वापर करणे रासायनिक खतावरील खर्च कमी करून योग्य खताची मात्रा दिल्यामुळे पिकाच्या उत्पादनामध्ये वाढ होण्याबाबत माहिती कृषी दुतांनी दिली.
या कार्यक्रमाला सरपंच, उपसरपंच, सदस्य,ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू डी चव्हाण, कार्यक्रम अधिकारी- प्रा. स्वप्निल लाळगे, प्रा. नितिशा पंडित मॅडम, समन्वयक प्रा. निलिमा धालपे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत इंगोले धनंजय,केसकर राहुल, काटकर सौरभ, कांबळे रोहन, गोडसे आदित्य, धुमाळ श्रीजीत, रणवरे शिवतेज यांनी हा कार्यक्रम पार पडला.