पंचायत समिती सभापती पदांचे 7 ऑक्टोबर रोजी आरक्षण सोडत

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क

सातारा प्रतिनिधी : सातारा जिल्हयाच्या अधिकार क्षेत्रातील पंचायत समित्या गठीत होऊन लगतनंतरच्या दिवसापासून सुरु होणा-या अडीच वर्षाच्या कालावधीकरिता पंचायत समिती सभापती पदांचे आरक्षण सोडत कार्यक्रम दि 7 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे होणार आहे. तरी सातारा जिल्हयातील सर्व लोकप्रतिनिधी व नागरिक यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण यांनी केले आहे.

ग्रामविकास विभागाकडील 9 सप्टेंबर 2025 रोजीच्या पत्रानुसार सातारा जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदासाठीची प्रवर्गनिहाय संख्या निश्चित करणेत आलेली आहे. यानुसार सातारा जिल्हयामधील ११ पंचायत समित्यांचे सभापती प्रवर्गनिहाय आरक्षण पुढीलप्रमाण आहे. अनुसुचित जाती प्रवर्ग (महिला) 1, नागरिकाचा मागास प्रवर्ग (महिला) 2, नागरिकाचा मागास प्रवर्ग (खुला) 1, सर्वसाधारण प्रवर्ग (महिला) 3, सर्वसाधारण प्रवर्ग (खुला) 4 अशी एकूण 11 पदे आरक्षित करण्यात आलेली आहेत.

error: Content is protected !!