महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क
फलटण प्रतिनिधी – फलटण पंचायत समिती सदस्य पदांसाठीची आरक्षण सोडत सजाई गार्डन, जाधववाडी येथे पार पडली. या सोडतीमध्ये एकूण १६ गणांपैकी ८ गण हे महिलांसाठी राखीव करण्यात आले आहेत. तर एकूण १६ गणांपैकी १० गण सर्वसाधारण, ४ गण नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) व २ गण अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहेत एकूणच जाहीर आरक्षणामुळे फलटण तालुक्यातील राजकीय समीकरणाला चांगला फटका बसल्याचे बोलले जात आहे.
यावेळी प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर व तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांच्या उपस्थित पंचायत समिती आरक्षण प्रक्रिया पार पडली. यावेळी सोडतीच्या आरक्षणाच्या चिठ्ठ्या शालेय मुला-मुलींच्या हस्ते काढण्यात आल्या. पंचायत समिती सभापतीपद नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे.
जाहीर सोडतीनंतर अनेक दिग्गज निवडणूक प्रक्रियेतून बाहेर पडले असून अनेकांना स्वतःचा गण आरक्षित झाल्याने दुसऱ्या गणात उभे राहण्याची वेळ आली आहे. अनेक वर्षापासून पंचायत समिती लढण्याची तयारी केलेल्या अनेक नेत्यांना झटका बसला आहे. आगामी पंचायत समिती निवडणुकीची रंगत वाढणार असून विविध गणांमध्ये इच्छुकांची हालचाल सुरू झाली आहे. उचला उमेदवार यांना गणातील मतदार नाकारण्याची शक्यता असल्याने पंचायत समिती निवडणुकीत चांगला पेच निर्माण झाला आहे.
फलटण पंचायत समिती सदस्य पदांसाठीची आरक्षण आरक्षण सोडत पुढीलप्रमाणे
पाडेगाव – सर्वसाधारणतरडगाव – सर्वसाधारण (महिला)
साखरवाडी-पिंपळवाडी – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
सस्तेवाडी – नागरिकांचा मागास प्रवर्ग
सांगवी – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
विडणी – सर्वसाधारणगुणवरे – अनुसूचित जाती (महिला)
आसू – अनुसूचित जातीबरड – सर्वसाधारण (महिला)
दुधेबावी – सर्वसाधारण (महिला)
कोळकी – सर्वसाधारण
जाधववाडी (फ) – सर्वसाधारण
वाठार निंबाळकर – सर्वसाधारण (महिला)
सुरवडी – सर्वसाधारण
सासवड – नागरिकांचा मागास प्रवर्ग
हिंगणगाव – सर्वसाधारण (महिला)

