दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालया अंतर्गत वृक्षारोपण

ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव):- उमरकांचन ता. पाटण या ठिकाणी दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालय राजमाची ता. कराड यांच्या माध्यमातून 1 जुलै 2025 रोजी ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत कृषी दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्ताने उमर कांचन या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी ढेबेवाडी येथील वनाधिकारी अमर पन्हाळे त्यांचे सहकारी व विपुल गोडांबे, मोकाशी महाविद्यालयाचे प्राध्यापक अक्षय माने, तसेच येथील ग्रामस्थ उपस्थित होते. त्या ठिकाणी आंबा पेरू सुपारी या वृक्षांची लागवड करण्यात आली. ग्रामीण कृषी कार्यानुभव चे सदस्य अभिजीत पवार, शुभम गावडे, शिवम शिंदे, विनायक थोरात, शिवम लोंढे, प्रफुल्ल जाधव मोकाशी हे महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.

error: Content is protected !!