ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव) :- बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये ग्राहकांची गैरसोय होत असल्याने ढेबेवाडी विभागातील ग्रामस्थ व व्यापारी असोसिएशन च्या वतीने महाराष्ट्र बॅंकचे शाखाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

ढेबेवाडी विभाग हा डोंगर वस्त्यानीं विस्तारलेला आहे त्यामुळे बँकेत येणारा ग्राहक हा सुमारे १५-२० किलोमीटर वरून येत असतो. त्यांना बँकेच्या के. वाय. सी. पूर्ण करण्यासाठी सुद्धा दोन तीन दिवस रोज हेलापाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे त्यांच्या वेळेबरोबर खर्च ही मोठ्या प्रमाणात होत आहे. तर व्यापारी वर्गाला आर. टी. जी. एस. साठी स्वतःचा व्यवसाय सोडून बँकेमध्ये चार पाच तास थांबावे लागत आहे.

तर बँकेमध्ये काही स्टाप हिंदी भाषेत बोलत असल्याने जेष्टवर्गाला हिंदी भाषा बोलता येत नसल्याने. त्याचा नाहक त्रास होत आहे. याबाबत वारंवार तक्रार करूनही उपाय योजना काहीच होत नसल्याने त्या लवकरात लवकर कराव्यात अन्यथा २०मार्च २०२५ नंतर बँक ऑफ महाराष्ट्र च्या ढेबेवाडी शाखेस टाळे ठोकणार असल्याचे व्यापारी वर्गाने ठरवले आहे. आता मार्च एन्ड मुळे व्यापारी वर्गाला व्यवहार करताना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.