ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव):- पाटण तालुक्याच्या कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी वर्ग-१ सरिता पवार यांची ढेबेवाडी विभागात जलतारा, शोषखड्डे, वृक्ष लागवड, स्वच्छता सर्वेक्षण ग्रामीण २०२५ व घरकुले यांची प्रत्यक्ष पाहणी करून विभागात वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्यात आला.

यावेळी ठिक ठिकाणच्या ग्रामपंचायतीस भेटी देऊन सदर विषयांची सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले व सदरील सर्व योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन ग्रामस्थांना केले.तसेच गावातील सरपंच व ग्रामस्थांच्या अडीअडचणींचा निपटारा केला. सदर वेळी महिंद बाचोली, सणबूर व बनपूरी गावातील लाभार्थी मोठ्या उत्साहात उपस्थित होते.

या वेळी विभागातील घरकूल लाभार्थी यांनी प्रशासनास चांगला प्रतिसाद देऊन घरकूले पूर्ण केलेली असुन शिल्लक कामे प्रगती पथावर असल्याची माहिती दिली. पुर्ण घरकुलाचे ग्रहप्रवेश मा. गटविकास अधिकारी सरिता पवार यांनी गावोगावी जाऊन प्रत्यक्ष घेतले.यावेळी ढेबेवाडी भागातील ग्रामपंचायत अधिकारी यांनी तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारे कामे केल्याबद्दल गटविकास अधिकारी सरीता पवार यांनी तोंडभरून सर्वांचे कौतूक केले त्याच प्रमाणे जास्तीत जास्त योजना लोकापर्यंत पोहचविण्याचे आवाहन केले.

यावेळी विस्तार अधिकारी राजेंद्र सावंत घरकुल विभागाचे प्रतिक पाटील, नरेगा कक्ष, स्वच्छ भारत मिशन कक्ष, सरपंच व विभागातील ग्रामपंचायत अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.