ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव) : येथील मुस्लीम बांधवांनी रमजान ईद मोठ्या उत्साहाने व आनंदी वातावरणात साजरी केली. रमजान ईदच्या निमित्ताने सोमवारी सकाळी ८.30 च्या सुमारास ढेबेवाडी बाजारतळ येथेली मज्जीद येथे मोठ्या संख्येने समाज बांधव एकत्र येऊन सामुहिक नमाज अदा केली.
उपवासाच्या माध्यमातून महिनाभर अल्लाहची साधना केल्यानंतर आलेले आनंदाचे पर्व. पाटण तालुक्यात ठिकठिकाणी ईदचा सण हा आनंद, उत्साहात साजरा करण्यात आला. राजकीय नेतेमंडळींपासून ते सर्वसामान्य नागरिकांनी ईदच्या या पर्वात सहभागी होत मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या. यासह मुस्लीम बांधवांनीही ईदची दुआ करताना सर्वांना सुख समाधाना मिळण्यासह सलोख्यात वाढ व्हावी, अशी दुआ अल्लाहकडे मागितली.