ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव) :- औद्योगिक प्रशिक्षण केंद्र स्थानिक सल्लागार समिती पाटण तालुका सदस्य या पदी गणेश नाथाराम यादव निवड झाली आहे.गणेश यादव सध्या भारतीय जनता पार्टी अध्यक्ष पाटण तालुका व उपसरपंच साईकडे ग्रामपंचायत ता पाटण चे काम बघतात. त्यांच्या सामाजिक राजकीय विविध क्षेत्रांमधील कामाच्या अनुभवानुसार भारतीय जनता पार्टीमध्ये पाटण तालुका अध्यक्षपदी ते गेले अनेक वर्ष कार्यरत आहेत.

तरुणांचा मोठ्या प्रमाणात संपर्क ढेबेवाडी तळमवले भागामध्ये भारतीय जनता पार्टी रुजवण्यात गणेश यादव यांचा मोठा वाटा आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. औद्योगिक प्रशिक्षण केंद्र स्थानिक सल्लागार समितीमध्ये गणेश यादव यांची निवड झाल्यामुळे तरुण वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.एक तरुण तडफदार होऊन सल्लागार समितीमध्ये निवड झाल्यामुळे विविध क्षेत्रांमधून गणेश यादव यांना शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

पाटण तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दोन्ही गटांचे काही काळ वर्षाचे होते तर आत्ताच्या घडीला शिवसेना शिंदे गटाचे स्थानिक आमदार मंत्री शंभूराजे देसाई यांचे मोठे वर्चस्व आहे. त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व व तरुण वर्गाची मोठी फळी निर्माण केली आहे. गणेश यादव यांनी केलेले कष्टाचे फळ त्यांना वारंवार भारतीय जनता पार्टी कडून देण्यात येत आहे. त्यांच्या कामाचा उत्साह पाहून भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ स्तराकडून अनेक वेळा गणेश यादव यांचे सत्कार व अभिनंदन करण्यात आलेले आहे.

तळमवले ढेबेवाडी सारख्या दुर्गम भागामध्ये पक्षाचा प्रचार करण्यासाठी अनेक अडचणींना तोंड देत गणेश यादव यांनी भारतीय जनता पार्टी पाटण तालुक्यामध्ये एक मोठी फळी तरुणांची निर्माण केलेली आहे. याच अनुषंगाने औद्योगिक प्रशिक्षण केंद्र स्थानिक समितीमध्ये निवड झाल्यामुळे पाटण तालुका अध्यक्ष गणेश यादव यांचे विविध स्थरातून विशेष अभिनंदन होत आहे.