मौजे साईकडे वैकुंठधाम येथील विविध कामांचा लोकार्पण सोहळा पडला पार

ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव) : साईकडे ता.पाटण येथे स्मशानभूमीचा लोकार्पण सोहळा पार पडला.मौजे साईकडे वैकुंठधाम येथे विविध कामे पूर्ण करण्यात आली आहेत. ग्रामस्थांच्या व मान्यवरांच्या उपस्थिती लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता.

यावेळी भारतीय जनता पार्टी पाटण तालुका अध्यक्ष व साई कडे गावचे उपसरपंच गणेश यादव ,पोपट यादव, ग्रामपंचायत सदस्य राहुल पाटील ,माजी ग्रामपंचायत सदस्य हिंदुराव यादव, विक्रांत मोरे, जयदीप मोरे, उदयसिंह मोरे ,आत्माराम निंबाळकर, कॉन्ट्रॅक्टर सुनील आढावकर ,प्रसाद मोरे, राजू कांबळे ,वैभव कांबळे ,उत्तम लोहार ,महेश मोरे, काशिनाथ पाटील, हनुमंत पाटील ,सतीश गुजर, चव्हाण सर, इत्यादी उपस्थित होते.

मौजे साईकडे वैकुंठधाम मध्ये पोहोचण्यासाठी गावातील दोन बाजूने काँक्रीटचे रस्ते, ⁠दोन शवदाहिनी शेड (आपल्या गावात पुर्व-पश्चिम आणि दक्षिणोत्तर अशा दोन्ही प्रकारे दहन करण्याची पद्धत आहे म्हणून दोन शवदाहिनी शेड बांधले आहेत. सगळ्यांना दोन्ही शेड वापरता येणार आहेत), नैवेद्य ठेवण्यासाठी कट्टा, रक्षा वाहून जाण्यासाठी भुमीगत पाईपलाईन, हातपाय धुण्यासाठी पाण्याची टाकी, ⁠वेटिंग शेड (आसनव्यवस्था सावलीसह), वैकुंठधाम परिसराला संरक्षक भिंत, स्वागत कमान, ⁠गणेश विसर्जनासाठी नदीकडे जाण्यासाठी पायऱ्या अशी सर्व कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

error: Content is protected !!