भारतीय जनता पक्षाच्या पाटण तालुकाध्यक्षपदी गणेश यादव यांची फेरनिवड

l महाराष्ट्र माझा l ढेबेवाडी प्रतिनिधी l दि. २५ एप्रिल २०२५ l महेश जाधव

साईकडे, ता. पाटण गावचे उपसरपंच व विद्ममान अध्यक्ष गणेश यादव यांची भारतीय जनता पक्षाच्या पाटण तालुकाध्यक्ष पदी फेर निवड करण्यात आली आहे.पक्षाने दिलेल्या जबाबदारीला तडा न घालवता प्रामाणिकपणे काम करुण गेल्या दीड वर्षांच्या कामाची दखल घेऊन वरीष्ठ पातळीने गणेश यादव यांची पाटण तालुकाध्यक्षपदी फेर निवड केली आहे.

पाटण तालुक्यात गणेश यादव यांनी तळागळात जाऊन पक्ष संघटना वाढण्यासाठी कामे केले आहे. तालुक्यातील प्रत्येक गावात बुथ कमिटी, सभासद नोंदणी तसेच पक्षाची ध्येय धोरणे राबवली, त्यांच्या या कामाची पोचपावती म्हणुन त्यांची पाटण तालुकाध्यक्ष फेर निवड केली आहे.

त्यांच्या या निवडीबद्दल भाजपाचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे,अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, माजी अध्यक्ष विक्रम पावस्कर, प्रदेश प्रतिनिधी अँड. भरत पाटील, जिल्हा उपाध्यक्ष दीपक महाडिक यांनी कौतुक केले.

गणेश यादव यांची भाजपा पाटण पुर्व अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभीनंदन.पुढील वाटचालीस शुभेच्छा

शुभेच्छुक – सचिन फल्ले भाजप पाटण ओबीसी मोर्चा सरचिटणीस

error: Content is protected !!