ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव) :- श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त झालेल्या संविधान संमेलनात ढेबेवाडी भाग्यश्री मंगल कार्यालय येथे उत्कृष्ट, प्रबोनात्मक कवी या नात्याने तुळशीराम सुतार यांना श्रीमंत कोकाटे सुप्रसिद्ध वक्ते व इतिहास अभ्यासक सुरेशजीं माने, संविधान तज्ञ् विनोदभाऊ निकाळजे, राष्ट्रीय सामाजिक लोकप्रतिनिधी व कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच रविकुमार कांबळे अध्यक्ष ज्ञानसूर्य फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या मान्यवरांच्या उपस्थितीत शिवरंत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

डाँ. बाबासाहेब आंबेडर यांचा विज्ञानवादी द्रुष्टीकोन संविधानात आहे. संविधान आपले हक्क अधिकाराची जपनूक करते न्यायाची ताकद देते म्हणून संविधान अभ्यासाची चळवळ घराघरात राबविली गेली पाहीजे.असे प्रतिपादन संविधान तज्ञ सुरेशजी माने यांनी केले.यावेळी हजारोच्या संख्येने जनसमुदायाची उपस्थिती होती. श्रीमंत कोकाटे, सुरेशजीं माने, विनोदभाऊ निकाळजे यांनी आपल्या संविधानमय भाषणानी व्यासपीठ गजबजून टाकले.या कार्यक्रममाचे निवेदक व तडाके सर यांनी व सुत्रसंचालन तुळशीराम सुतार यांनी केले तसेच आभार रवीकुमार कांबळे यांनी मानले.