ढेबेवाडी येथील श्री मरीआई लक्ष्मीदेवी यात्रेला आज पासून प्रारंभ

l महाराष्ट्र माझा l ढेबेवाडी प्रतिनिधी l महेश जाधव l दि.३ मे २०२५ l

ढेबेवाडी व ढेबेवाडी परीसरातील श्री मरीआई लक्ष्मीदेवी यात्रेला आज पासुन प्रारंभ झाला असून सलग चार दिवस असणारी ढेबेवाडी गावची यात्रा परीसरातील नागरीकांचे लक्ष वेधुन घेत असते.यात्रा काळात बाजारतळ या ठिकाणी अनेक यात्रेकरु तसेच मिठाईची दुकाने ,खेळण्यांची दुकाने,लहान मुलांचे पाळणे, आकाश पाळणे यांनी बाजारतळ अगदी गजबजुन जातो.त्या ठिकाणी अपुऱ्या प्रकाशाच्या दृष्टीने ढेबेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने अनेक ठिकाणी लाईटचे बल्ब लावण्यात आले आहेत. काही अनुचित प्रकार घडु नये यासाठी ढेबेवाडी ग्रामपंचायत व ढेबेवाडी यात्रा कमिटी यांच्याकडून दक्षता घेतली जात आहे.

देवीचा छबीना व पालखी सोहळा

रविवार दि.४ रोजी श्री मरीआई लक्ष्मीदेवीचा सायंकाळी ४ वाजता पालखी सोहळा होणार आहे.सोमवार दि.५ रोजी पहाटे ६ वाजता देवीचा आभिषेक व पालखी छबीना.

रसीक प्रेक्षकांसाठी मनोरंज कार्यक्रम

शनिवार दि.३ रात्री ९ वाजता वैभव आँर्केस्ट्रा, रविवार दि.४ रात्री ९ वाजता व सोमवार दि.५ सकाळी १० वाजता लोकनाट्य तमाशा माया मलकापूरकर,सोमवार दि.५ दुपारी ४ वाजता निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान, मंगळवार दि.६ रोजी रात्री ९ वाजता बहारदार लावण्या, लावण्यखणी अशा मनोरंजक कार्यक्रमाचे आयोजन श्री मरीआई लक्षीदेवी यात्रे निमित्ताने ढेबेवाडी बाजारतळ या ठिकाणी करण्यात आले आहे.

तरी या कार्यक्रमाचा व ढेबेवाडी यात्रेचा आनंद रसीक प्रेक्षक व भक्त भाविक यांनी घ्यावा असे आवाहान श्री मरीआई लक्ष्मीदेवी यात्रा कमिटी ढेबेवाडी, ढेबेवाडी (खुर्द ), ढेबआळी , ग्रामपंयत ढेबेवाडी सरपंच , उपसरपंच , सर्व सदस्य व सर्व गणेश मंडळे यांनी केले आहे.

error: Content is protected !!