ढेबेवाडी प्रतिनिधी – महेश जाधव :- ढेबेवाडी येथील प्रवाशांनी भरलेली एसटी बस स्थानकाच्या मुख्य द्वारावर येताच बंद पडल्याने प्रवाशांनी उतरुन ” दे धक्का ” करत एसटी बसस्थानकात नेली.
पाटण तालुक्यातील सर्वात मोठे बसस्थानक म्हणुन ढेबेवाडी बसस्थानकाची ओळख आहे.या बसस्थानकाच्या माध्यमातून एसटी महामंडळाला मोठे उत्पंन्न मिळते . मात्र त्या तुलनेत प्रवाशांना सुविधा मिळत नाहीत.अशा अनेक बसेस आहेत त्याच्या खिडक्या तुटल्या आहेत,कुशन खराब आहेत,पत्रे चेपले आहेत,तर काही बसेस धुर सोडत आहेत. इंजिनची अवस्था काय हे चालकाला माहीत अशा बिकट परीस्थीत ना दुरुस्त एसटी मधून प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे.त्यामुळे प्रवाशी वर्गामध्ये नाराजी दिसत आहे.ढेबेवाडी विभागात ७० गावे आणी १९ वाड्यावस्त्या या डोंगर घाट परीसरात विस्तारलेल्या आहेत. अशा ना दुरुस्त बसेसने प्रवास करत असताना डोंगर घाटात जर चालु स्थितीत एसटी बंद पडली तर मोठा अपघात होऊ शकतो त्यामुळे ना दुरुस्त बसेस दुरुस्त झाल्या शिवाय रस्त्यावर सोडु नयेत अशी प्रवाशांची भावणा आहे.
महाराष्ट्रातील ज्या आगारातील एसटी बसेस नादुरुस्त आहेत .या कडे संबधीतांनी लक्ष देणे आवश्यक आहे.नादुरुस्त एसटी बसेस संर्दभात आगार प्रमुखांनी लक्ष घालुन प्राधान्यांने या एसटीची दुरुस्ती करुन घ्यावी.ढेबेवाडी हा भाग दुर्घम असाल्याने प्रवाशांना याचा नाहक त्रास होतोय.
अभिजीत कडव – उपसरपंच ढेबेवाडी