ढेबेवाडी प्रतिनिधी ( महेश जाधव ) :- धर्मवीर छत्रपती श्रीसंभाजी महाराज यांना कैद झाली त्या दिवसापासून सलग ४० दिवस रोज त्यांच्या वरती अमानुष पणे छळ करुन त्यांच्या शरीराचे लचके काढण्यात आले व अखेर त्यांनी धर्मासाठी आपल्या शरीराचे बलीदान दिले. याची जाण प्रत्येक हिंदु बांधवांच्या मनात रहावी या साठी हा महीना बलीदान मास म्हणुन पाळला जातो.

फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या पकडले गेल्या क्षणापासून, अतिक्रूर पाशवी छळ सहन करणाऱ्या, धर्मवीर श्रीसंभाजी महाराजांचा रोज एक-एक अवयव तोडत होते. रोज अंगाची साल सोलून काढत होते. शेवटी फाल्गुन अमावस्येचे दिवशी पायापासून डोक्यापर्यंत देहाचे कुऱ्हाडीने तुकडे-तुकडे केले. म्हणजेच श्रीसंभाजी महाराज मृत्यूच्या दिशेने, बलिदानाच्या मार्गावर, संपूर्ण महिनाभर, रोजच अति धीरोदात्तपणे, चालत होते. म्हणून त्यांना २८ फेब्रुवारी ते २९ मार्च पर्यंत रोजच सामाजिक व कौटुंबिक स्तरावर संपूर्ण महिनाभर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने व संभाजी भिडे ( गुरुजी ) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक दिवशी ढेबेवाडी झेंडा चौक व ढेबेवाडी परीसरातील इतर गावामध्ये सायं ७.३० ते ८ या वेळेत प्रेरणामंत्र, व ध्येयमंत्र, व श्लोक घेउन श्रद्धांजली वाहीली जाते.

“धर्मवीर बलिदान मास” पाळणे, हे प्रत्येक हिन्दुमात्राचे पवित्र असे आद्य धर्मकर्तव्यच आहे.धर्मवीर श्रीसंभाजी महाराजांनी शेवटच्या दिवसांत अन्नपाण्याचा त्याग केला होता. हे लक्षात घेऊन प्रत्येक हिंदु बांधव व धारकरी संपूर्ण मास संपेपर्यंत दिवसाकाठी एकदाच जेवने. मिष्ठान्न न खाण्याचा निश्यच .या महिनाभरात चहा न पिणे, पान-तंबाखू न खाणे, व पायांत पादत्राणे न घालणे. मुंडन करणे हा महिना आपणा सर्वच हिंदू बांधवांना शोकाचा, दुःखाचा, सुतकाचा माणुन कोणत्याही आनंदाच्या, उत्सवाच्या कार्यक्रमाचे आयोजन न करने .अशा कृतीतून श्रध्दांजली व बलिदान मास पाळला जातो. असे श्री शिव प्रतिष्ठाण हिंदुस्थान ढेबेवाडी विभाग प्रमुख निशिकांत बेंडखळे यांनी सांगीतले.
