l महाराष्ट्र माझा l ढेबेवाडी प्रतिनिधी l दि. २६ एप्रिल २०२५ l महेश जाधव
काश्मीरच्या पहलगाम येथे भारताच्या विविध भागातून आलेल्या २८ पर्यटकावर दहशतवाद्यांकडून अमानुषपणे गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली. सर्वच पर्यटकांना त्यांचा धर्म विचारत त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या भ्याड हल्यात मृत्यू पावलेल्या नागरिकांना ढेबेवाडी येथील झेंडा चौक येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली व पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला.
यावेळी माजी कृषी सभापती हिंदुराव पाटील (बापू) म्हणाले की, पहलगाम येथे पर्यटनाला गेलेल्या नागरिकांना त्यांचा धर्म विचारुण त्याच्यावरती गोळ्या झाडल्या अशा पध्दतीचे जे क्रुत्य केले आहे. त्याचा आज सर्व जगामध्ये निषेध होत आहे.आपण सुध्दा त्या क्रुत्याचा निषेध करुया पाकिस्तान मध्ये या दहशदवाद्यांच्या टोळ्या सापडत आहेत याचा अर्थच आहे .पाकिस्तान हे दहशतवादी राष्ट्र आहे आणि ते संपवण्याच काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमीत शहा, राजनाथ सिंग यांच्या नेतृत्वाखाली चालु आहे. त्याला आम्ही हिंदु भारतीय म्हणुन पाठिंबा देत आहोत. यावेळी उपस्थित नागरीकांनी हम सब हिंदू एक है पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या.
यावेळी आंनदराव पतसंस्थेचे चेअरमन अभीजीत पाटील, सणबुर गावचे माजी सरपंच सचिन जाधव, महींद गावचे उपसरपंच, प्रदीप पाटील, शिवाजी पवार तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

