३५१ व्या हिंदू साम्राज्य दिनानिमित्त ढेबेवाडी येथे रक्तदान शिबिर संपन्न

ढेबेवाडी प्रतिनिधी- महेश जाधव :- दि. ८ रोजी ढेबेवाडी ता पाटण येथे ३५१ व्या हिंदू साम्राज्य’ दिनानिमित्त सकल हिंदू समाज व ढेबेवाडी व्यापारी असोसिएशन आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या वतीने ग्रामपंचायत ढेबेवाडी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर मदनराव मोहीते यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी 51 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्त संकलन करण्यासाठी महालक्ष्मी ब्लडबँक यांची उपस्थिती होती. यावेळी तरुण मित्र मंडळे, ग्रामस्थ आणि विविध हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी तसेच ढेबेवाडी पोलीस स्टेशन मधील कर्तव्य दक्ष अधिकाऱ्यांनी रक्तदान करून रक्तदानाचे कर्तव्य बजावले. ढेबेवाडी पोलीस स्टेशन चे ए.पी.आय डॉ. प्रवीण दाईगडे यांनी सदरकार्यमास शुभेच्छा दिल्या, तसेच नवनाथ कुंभार यांनी मार्गदर्शन करताना, आजच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून दैवत म्हणून विचार करून संकुचित करण्यापेक्षा प्रत्येक घरात छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार पोहोचवावेत असे विचार व्यक्त केले.

ढेबेवाडी ग्रामपंचायत चे उपसरपंच अभिजित कडव यांनी सर्व व्यवस्था करून सहकार्य केले.तर व्यापारी असोसिएशन यांनी यानिमित्ताने मोलाचे सहकार्य केले. सकल हिंदू समाजाच्यावतीने दरवर्षी असे रक्तदान शिबीर आयोजित केले जाते व विभागातील रुग्णांना आवश्यकतेनुसार रक्तदान करून कार्यकर्ते रक्तदानाचे कर्तव्य बजावत असतात अशी कृतज्ञता रा स्व संघांचे कार्यवाही उदयसिंह साळुंखे यांनी व्यक्त केले.

शिवराज्याभिषेक प्रत्येक गावात साजरा करताना गावातील मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करावे या पूजनासाठी सर्व ग्रामस्थ महिला तरुण यांचा सहभाग असावा आणि ग्रामदैवताची आरती करून प्रसाद वाटप करावे असा हिंदू साम्राज्य दिनाचा उत्सव साजरा करण्यात यावा असे आवाहन हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!