ढेबेवाडी येथील गटार तुंबल्याने दूषित पाणी रस्त्यावर, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर

ढेबेवाडी प्रतिनिधी :- दोन ग्रामपंचायतच्या हद्दीच्या वादामुळे गटारगंगा रस्त्यावर वाहत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून याप्रकरणी तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांच्यातून होत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, येथील ग्रामपंचायतीने ढेबेवाडी ता. पाटण (ढेबआळी ) येथे मोरे दुकान ते काळगुडे गुरुजी यांच्या घरापर्यंत नवीन गटार बांधले आहे. या गटातील पाण्याचा निचरा होण्यासाठी काही दिवसा पूर्वी बांधण्यात आलेला शोषखड्डा गटारीतील पाण्याने भरून तुंबला असल्याने या गटारातील दूषित पाणी गेल्या काही दिवसांपासून ते रस्त्यावरती येत आहे. यामुळे येथील रहिवासी नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

या रस्त्यावरून ये-जा करत असताना नागरिकांना व लहान मुलांना या दुर्गंधीचा सामना करत नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दोन्ही ग्रामपंचायतच्या हद्दीच्या वादामुळे गटारगंगा रस्त्यावर वाहत आहे.यामूळे दोन्ही ग्रामपंचायतीने एकत्र येऊन यावरती तोडगा काढावा अशी जनतेकडून मागणी होत आहे.

गटाराचे पाणी रस्त्यावर येत असल्याने मच्छरचे प्रमाण देखील या ठिकाणी वाढले असून येथून पन्नास फूट अंतरावरच अंगणवाडी आहे. अंगणवाडीत शिकत असलेल्या मुलांचा व या ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. ढेबेवाडी येथील हद्दीतील गटाराचे दूषित पाणी मंद्रुळ ग्रामपंचायतच्या हद्दीत येत आहे. या स्वरूपाचे लेखी निवेदन येथील नागरिकांनी मंद्रुळ ग्रामपंचायतकडे देण्यात आले आहे. लवकरात लवकर या ठिकाणी ठोस उपाययोजना करून. नागरिकांना होणाऱ्या या त्रासापासून मुक्त करावे. सुभाष ढेब (सदस्य, ग्रामपंचायत मंद्रुळ कोळे )

error: Content is protected !!