गावपातळीवर पोलीस पाटलांचे महत्वाचे योगदान ; प्रांताधिकारी सोपान टोम्पे

ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव) :- पोलीस पाटील हे गाव पातळीवरील काम करणारे एक महत्वाचे पद असून त्यांची मुख्य जबाबदारी गावात कायदा व सुव्यवस्था राखणे तसेच महसूल आणि पोलीस प्रशासनाला मदत करणे हे मुख्य कार्य असून पोलीस पाटील आपली जबाबदारी अत्यंत निष्ठेने पार पडतोय ही आनंदची बाब आहे. इथून पुढेही पोलीस पाटील आशयाचं पद्धतीने काम करून प्रशासनास मदत करतील असे मत पाटणचे प्रांताधिकारी सोपान टोम्पे यांनी व्यक्त केले.

तळमावले ता.पाटण येथे आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघाचे राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांच्या उपस्थितीत पाटण तालुका गावकामगार पोलीस पाटील संघटनेची नवीन कार्यकारिणी जाहिर करण्यात आली यावेळी पाटणचे प्रांताधिकारी सोपान टोम्पे बोलत होते.

यावेळी पाटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी विजय पाटील,सहाय्यक पोलीस आयुक्त संतोष पवार,ढेबेवाडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ प्रविण दाईंगडे,नायब तहसीलदार पी.डी.पाटील, मंडलाधिकारी नागेश निकम, सातारा जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष प्रदिप गाढवे,यांची प्रमुख उपस्थित होते.गावातील ग्रामस्थांच्या अडचणी तक्रारी सोडवण्यासाठी आवश्यकतेनुसार पोलीस प्रशासनाला प्रत्येक प्रकारची मदत पोलिस पाटील तत्परतेने करत आहेत.

शिवाय कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलीस पाटील मोलाची कामगिरी बजावत आहेत. असे उपविभागीय पोलिस अधिकारी विजय पाटील म्हणाले.संघटनेचे राज्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी संघटनेची कार्यपद्धती व आजवर संघटनेने केलेल्या कामांची माहिती दिली. यावेळी संतोष पवार, पी डी पाटील यांची मनोगते झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित शिंदे व आभार संतोष पवार यांनी मानले.

    पाटण तालुका गावकामगार संघटनेची कार्यकारिणी अशी

    पाटण तालुकाध्यक्ष …नितीन पाटील, उपाध्यक्ष ..विक्रम वरेकर,सचिव..संग्राम पांढरपट्टे, सहसचिव… अमोल गायकवाड, तर सदस्य म्हणून बजरंग रामिष्टे,महादेव वरेकर,नितीन किसन पाटील, दिगंबर कदम,संध्या बाटे,वैशाली चव्हाण, संदीप भिंगारदेवे,कांचन सुतार, विकास माने,प्रकाश लोखंडे व विद्या माने यांची निवड करण्यात आली.

    error: Content is protected !!