ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव) : – ढेबेवाडी ते भोसगाव रस्त्यालगत असणाऱ्या काशी व शीसु सारख्या झांडांनी रस्त्यावर अतिक्रमण केल्याने ये-जा करणाऱ्या अवझड वाहनांना अडथळा निर्माण होत आहे.त्यामुळे दोन वाहने एकाचवेळी जात असतील तर झाडांना व फांद्यांना वाहने धडकत आहेत.

रस्त्यावर आलेल्या फांद्या व झाडांमुळे वाहतूक धोकादायक झाली आहे. भोसगापासुन पुढे मराठवाडी धरण, उमरकांच , कोळेकरवाडी , जिंती अशी अनेक गावे आहेत.त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते. गावांचे दळणवळण सुलभ व सुरक्षित झाले आहे.मात्र दळणवळण सोयीचे झाले असले तरी रस्त्यावर आलेल्या फांद्या व झाडे देखभालीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे हे ठिकाण अपघाताला आमंत्रण देत आहे.

रात्रीच्या वेळी अथवा दिवसा अवझड वाहने एकमेकांच्या जवळून जाताना झाडे व फांद्यांना चुकवण्याच्या नादात समोरुन आलेल्या वाहनावंर वाहन धडकत आहेत .त्यामुळे अनेक अपघात होत आहेत. संबंधित विभागाला जाग येणार तरी कधी ? असा प्रश्न नागरीकांच्यातुन व्यक्त केला जात आहे. या धोकादायक झाडांपासुन अपघात टाळण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने योग्य उपाययोजना करण्याची गरज आहे.