फलटण – संपूर्ण देशामध्ये जागतिक मृदा दीन म्हणून ५ डिसेंबर साजरा केला जातो या कार्यक्रमाचे औचित्य साधून सासकल येथे जागतिक मृदा दिन आयोजित केला होता ५ डिसेंबर जागतिक मृदा दिनानिमित्त सासकल येथे जमीन आरोग्य पत्रिका शेतकऱ्यांना मा सचिन ढोले उपविभागीय अधिकारी फलटण यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी तंत्र अधिकारी सुवास रणसिंग, तालुका कृषी अधिकारी फलटण दत्तात्रय गायकवाड, मंडळ कृषी अधिकारी विडणी शहाजी शिंदे, मनोज पवार सर,कृषी पर्यवेक्षक अजित सोनवलकर तसेच सासकल पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते. यावेळी उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी सेंद्रिय शेतीचा अवलंब केल्यास जमीनीचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होणार असून विषमुक्त शेतमाल तयार करण्यासाठी यावेळी शेतकऱ्यांना आवाहन सचिन ढोले यांनी केले.
यावेळी बबन रामचंद्र मुळीक यांच्या सिताफळ तोडणीचा शुभारंभ सचिन ढोले उपविभागीय अधिकारी फलटण यांच्या हस्ते करण्यात आला. बबन मुळीक यांनी राबवलेल्या विविध सेंद्रिय तयार करत असलेल्या निविष्टा व फळबागा लागवड प्रक्षेत्र भेट देऊन कौतुक केले. यावेळी तंत्र अधिकारी उपविभागीय अधिकारी कार्यालय फलटण सुहास रणसिंग यांनी नैसर्गिक शेती गट योजना मध्ये शेतकऱ्यानी सहभागी होऊन सेंद्रिय शेती च्या माध्यमातून सेंद्रिय शेती मला उत्पादन करणे बाबत आव्हान केले.
यावेळी दत्तात्रय गायकवाड यांनी जमिनीचे वाढते धूप तसेच बेसुमार रासायनिक खताचा वापर यामुळे जमिनीची सुपिकता कमी झाल्यामुळे पिकाचे उत्पादकताही कमी होत चाललेले आहे. पुढच्या पिढीला सुपीक जमीन देण्यासाठी आणि वाढत्या लोकसंख्येच्या अन्नधान्याची गरज भागवण्यासाठी जमीन सुपीकता असणे आवश्यक आहे. त्यामुळे माती परीक्षणाचे महत्व व माती परीक्षणानुसार खताचा संतुलित वापर करणे रासायनिक खतावरील खर्च कमी करून योग्य खताची मात्रा दिल्यामुळे पिकाच्या उत्पादनामध्ये वाढ होण्याबाबत माहिती यावेळे दत्तात्रय गायकवाड तालुका कृषि अधिकारी फलटण यांनी दिली.
उपस्थिती सर्वं मान्यवर व शेतकऱ्यांनी जागतिक जागतिक मृदा दिन प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी मोहन मुळीक, मनोहर मुळीक, ज्ञानदेव मुळीक, मुरलीधर मुळीक, संजय चांगण, विकास मुळीक, सत्यवान मुळीक, संपत मुळीक,भीमराव घोरपडे तसेच मोठया प्रमाणात सासकल गावातील पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते.
