फलटण प्रतिनिधी:- माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांनी फलटण येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर तात्काळ चालू करण्यासाठी होत असलेल्या यशस्वी प्रयत्नाबद्दल फलटण बार असोसिएशन तर्फे आमदार सचिन पाटील यांचे आभार मानण्यात आले.

फलटण येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर तात्काळ चालू करण्यासाठी उपलब्ध न्यायालय जागा व न्यायाधीश यांच्या राहण्यासाठी बंगला भाडेतत्त्वावर उपलब्ध असल्याचा रिपोर्ट न्यायालय मार्फत विधी व न्याय विभाग मुंबई उच्च न्यायालय यांच्याकडे रीतसर कळविण्यासाठी सिटी बिल्डिंगमध्ये उपलब्ध असणारे इमारती बाबत पुढाकार घेऊन तात्काळ तसे लेखी पत्र घेण्याबाबत आमदार सचिन पाटील यांच्याशी चर्चा करून मंजूर झालेल्या कामाबाबत पाठपुरावा करून लवकरात लवकर न्यायालय स्थापन करण्याबाबत यशस्वी प्रयत्न केला गेला आहे.

फलटण येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर चालू करण्याकरिता माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहे. फलटण येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर तात्काळ चालू करण्यासाठी होत असलेल्या पाठपुरावा बाबत आमदार सचिन पाटील यांचा फलटण बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.बापूसाहेब सरक यांनी पुष्पगुच्छ देऊन आभार मानले यावेळी फलटण बार असोसिएशन चे सन्माननीय सदस्य ॲड. अर्जून कोळेकर, ॲड. प्रशांत निंबाळकर तसेच संदीप चोरमले,तुकाराम शिंदे व ईतर मान्यवर उपस्थित होते.