फलटण प्रतिनिधी : फलटण गिरवी नाका येथे काल सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास विना नंबर प्लेट गाडीवर संशयास्पद फिरणाऱ्या दोन संशयितांना शहर पोलीसांनी पकडण्याचा प्रयत्न केला असता झालेल्या धरपकडीत त्यांनी एअर पिस्तुलातून हवेत गोळीबार करत पळून जाण्याचा प्रयत्न केल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली होती परंतु फलटण शहर पोलीसांनी एअरगण पिस्टल सदर आरोपीकडे आढळून आली आहे परंतु गोळीबार झाल्याच्या घटना घडल्याबाबत कोणताही पुष्टीदायक पुरावा अथवा साक्षीदार मिळून आले नाहीत अशी माहिती दिली आहे. शहर पोलीस ठाण्यात दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे.
फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दि.६ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास गिरवी नाका, लाँ काँलेजचे समोर अजय बाळु वाघमोडे (रा.मौजे तिर्वंदी, ता.माळशिरस, जि.सोलापुर) व अनोळखी एक व्यक्ती काळया रंगाची विना नंबर प्लेट असलेली स्पेंडर मोटारसायकल मिळुन आल्याने त्यास त्याचे नाव गाव विचारले तसेच फलटण येथे येण्याचे कारण विचारले असता त्याने कोणतेही समाधाणकारक उत्तर न दिल्याने त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेस पँन्टमध्ये खोवलेले एक एअरगण पिस्टल मिळुन आले. वरील मोटर सायकल चोरीची असण्याची शक्यता आहे.
याप्रकरणी पो.हवा संदीप दिलीप लोंढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन जणांच्या विरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा अधिक तपास म.पो.हवा. पूनम बोबडे करीत आहेत.
याबाबत फलटण शहर पोलीस निरीक्षक यांनी गिरवी नाका, फलटण येथे एका इसमास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. कायदेशीर कारवाई सुरू आहे. त्या इसमाकडील शस्त्रातून गोळीबार झाल्याची घटना घडल्याबाबत कोणताही पुष्टीदायक पुरावा अथवा साक्षीदार मिळून आले नाहीत अशी माहिती दिली आहे.