फलटणच्या विकासाचे नवे पर्व सुरू झाले आहे : समशेरसिंह ना निंबाळकर

फलटण : राज्यात भाजपाचे सरकार आले आहे ,फलटणला सुद्धा महायुतीचे उमेदवार सचिन पाटील निवडून आले आहेत मा खासदार रणजितसिंह यांच्या नेतृत्वाखाली खाली आता फलटणच्या विकासात कोणताही अडथळा राहणार नाही. नीरा देवधरचा पाणी प्रश्न सोडवला जाईल तालुक्यातील प्रलंबित विकास कामे मार्गी लावली जातील. फलटणला खऱ्या अर्थाने आता रयतेचे राज्य आले आहे. त्यामुळे फलटणच्या विकासाचे नवे पर्व सुरू झाले आहे फलटणचा निश्चित सर्वांगीण विकास होईल असे आश्वासन फलटण येथे फडणवीस यांच्या शपथविधी नंतर आनंदोत्सव प्रसंगी फलटण नगर पालिकेचे माजी विरोधीपक्ष नेते समशेरसिंह ना निंबाळकर यांनी दिले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेताच फलटण भाजपा व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जिलेबी व पेढे, साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला मुबंई येथील शिवाजी पार्क येथे सुरू असणारा शपथविधी सोहळ्याचे थेट प्रेक्षपण छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोठ्या स्क्रिन वर कार्यकर्ते व नागरिकांना दाखवण्यात आले. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला.

यानंतर शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी फलटण पालिकेचे माजी विरोधीपक्ष नेते समशेरसिंह ना निंबाळकर , रणवीरसिंह ना. निंबाळकर, माजी नगरसेवक अशोकराव जाधव , अनुप शहा , सचिन अहिवळे ,संजय गायकवाड , राजेंद्र निंबाळकर, आबा बेंद्रे यांच्यासह भाजपा चे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.          

error: Content is protected !!