फलटण – एकता गणेशोत्सव मंडळातर्फे आयोजीत करण्यात आलेल्या मिनी साउंन्ड कॉम्पीटीशन स्पर्धेवेळी झालेल्या किरकोळ वादातून १५ ते २० जणांनी हाताने लाथाबुक्यांनी व लाकडी दांडक्याने व लोखंडी फायटरने मारहाण करून, शिवागाळ दमदाटी केली व घराच्या तसेच दुकानाच्या काचा फोडुन लुटमार केल्या प्रकरणी फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार व फिर्यादी अरबाज अमिर शेख ( रा. बारवबाग फलटण) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, दि.१ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ ते रात्री १० पर्यंत एकता गणेशोत्सव मंडळातर्फे मिनी साउंन्ड कॉम्पीटीशन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी यश श्रीवास्तव याचे बरोबर आलेला हर्ष रोहिदास नलवडे याने फिर्यादी अरबाज याच्याशी वाद घालु लागला व म्हणाला की, एकतर आम्हाला पुढच्या राउंन्डला पाठवा नाहीतर ओंकार गुजर याचा साउन्ड स्पर्धेतुन बाद करा. असे म्हणुन हर्ष रोहिदास नलवडे, नोहेल तांदळे, विशाल कुऱ्हाडे, संकेत गणेश कापसे, संकेत अलगुडे (पुर्ण नाव पत्ता माहित नाही) यांनी फिर्यादी अरबाज यांना शिवीगाळ करून वाद घालु लागले. हर्ष रोहिदास नलवडे याने त्याच्या हातातील पेपर स्प्रे फिर्यादी अरबाज तसेच विशाल ठोंबरे, अब्बास शेख यांच्या तोंडावरती मारला व नोहेल तांदळे, विशाल कुऱ्हाडे, संकेत कापसे, संकेत अलगुडे (पुर्ण नाव पत्ता माहित नाही) यांनी फिर्यादी अरबाज यास हाताने लाथाबुक्यांनी मारहाण केली.
थोड्या वेळाने हर्ष रोहिदास नलवडे व नोहेल तांदळे, विशाल कुऱ्हाडे, संकेत गणेश कापसे, संकेत अलगुडे हे फिर्यादी अरबाज राहत असलेल्या घरासमोरील व्हरांड्यामध्ये आले व दरवाज्यावरती दगडी मारून तसेच खिडकीच्या काचा फोडुन नुकसान केले. थोड्या वेळात घराच्या पुढे रत्यावर पाच ते सहा मोटारसायकलवरून १५-१६ मुले आली. त्याचवेळी फिर्यादी अरबाज यांच्या शेजारी राहणारा आशिष जाधव तसेच फिर्यादी अरबाज यांचे वडील अमिर शेख व त्यांचे मित्र राजाभाऊ देशमाने हे तेथे भांडणे सोडविण्यासाठी आले. त्यावेळी त्यांना आकाश माने, हर्ष रोहिदास नलवडे, नोहेल तांदळे, विशाल कुऱ्हाडे, संकेत गणेश कापसे, संकेत अलगुडे यांनी व अनोळखी १६-१६ मुलांनी हाताने व लाथाबुक्यांनी व लोखंडी फायटरने मारहाण केली.
त्यावेळी आकाश माने याने त्याचे हातातील कोयता जिवे मारण्याची उद्देशाने फिर्यादी अरबाज यांच्या वडीलांच्या डोक्यात मारला परंतु तो फिर्यादी अरबाज यांच्या वडीलांनी हुकवला त्या दरम्यान आकाश माने यांनी झटापट करून फिर्यादी अरबाज यांच्या वडीलांनी पाच वर्षापुर्वी केलेले दोन तोळ्याचे सोन्याचे कडे हे हिसकावुन काढुन घेवुन गेले त्याचवेळी आशिष जाधव याला त्याचे डोळ्यावरती फायटर मारून खाली पाडुन त्याचे गळ्यातील सोन्याची चैन १५ ग्रॅम वजनाची व त्याच्या खिश्यातील पैशाचे पाकीट असे जबरदस्तीने काढुन घेवुन गेले. सदर प्रकरणी फिर्यादी अरबाज अमिर शेख ( रा. बारवबाग फलटण) यांनी फलटण शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून या गुन्ह्याचा अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.