फलटण प्रतिनिधी:- ऊसाचा ट्रँक्टरला वजन काट्यावर पुढचा नंबर न दिल्याने त्याचा राग मनात धरून ट्रॅक्टर चालकास मारहाण केल्याप्रकरणी ट्रॅक्टर मालक , चालक व दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फलटण शहर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार दि.१४/१२/२०२४ रोजी दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास श्रीराम साखर कारखाना फलटण ता.फलटण येथे फिर्यादी महावीर नामदेव तांबवे (रा.खुडूस ता.माळशिरस जि.सोलापुर) ऊसाचा ट्रँक्टर वजन काट्यावर लावणेसाठी थांबले असताना पाठीमागील ट्रँक्टर क्र एम.एच ११ ए.व्ही ६०८६ चा चालक सतिश खुडे (पुर्ण नाव माहीत नाही) यास पुढे नंबर न दिल्याने त्याचा राग मनात धरून त्याने त्याचा मालकास बोलावुन घेवुन ट्रँक्टर क्र एम.एच ११ ए.व्ही ६०८६ चा मालक रघुनाथ हिंमत रुपनवर (रा बोरावकेवस्ती लोणंद ता माळशिरस,नातेपुते) व त्याचे सोबत इतर अनोळखी दोन व्यक्ती यांनी येवुन तेथील पडलेले ऊस रघुनाथ हिंमत रुपनवर याने हातात घेवुन फिर्यादी चे डोक्यात व अंगावर मारहाण करु लागला.

तसेच त्याच्या सोबत चालक सतिष खुडे व इतर दोघांनी अंगावर ऊसाने मारहाण करुन रघुनाथ हिंमत रुपनवर व ट्रँक्टर चालक सतिष खुडे यांनी तु माळशिरस येथे दिसलास तर तुला मारुन टाकीन अशी धमकी दिली असुन झाले मारहाणीत फिर्यादीस मुक्कामार लागल्याने ट्रँक्टर मालक रघुनाथ हिंमत रुपनवर (रा बोरावकेवस्ती लोणंद ता माळशिरस,नातेपुते जि सोलापुर) ,ट्रँक्टर क्र एम.एच ११ ए.व्ही ६०८६ वरील चालक सतिष खुडे (पुर्ण नाव माहीत नाही) व इतर दोन अनोळखी व्यक्ती (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही) यांच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपासी म.पो.हवा. माधवी बोडके करत आहेत.