अंधश्रध्देतून हत्या प्रकरणी मृतदेह आढळलेल्या परिसरात सापडली धारदार शस्त्रे

फलटण:- विडणी २५ फाटा येथे अज्ञात महिलेचा मृतदेह अघोरी प्रकार असल्याचे आढळून आल्याने ऊसाचे पंधरा एकरातील क्षेत्र ऊस तोडून मोकळे केल्यावर परिसरात पोलिस पाहणी करताना दोन सुरी व एक सत्तुर सारखे तीक्ष्ण हत्यारे मिळून आल्याने अंधश्रध्देतून महिलेची अमानुषपणे हत्या केल्याचे जाणवत आहे.

विडणी २५ फाटा येथे अज्ञात महिलेचा मृतदेह अघोरी अंधश्रध्देचा प्रकार असल्याचे आढळून आल्याने ऊसाचे पंधरा एकरातील क्षेत्र ऊस तोडून मोकळे करणेत आले घटनेचे गांभिर्य ओळखून पोलिसांनी वरिष्ठ अधिकारीसह वेगवेगळ पथक नेमून श्वानाव्दारे तपासणी केली.फॉरेन्सिक पथकाने नमुने घेण्यात आले.मृतदेहाचे कवटी अर्धवट मृतदेह तपासणी साठी नेण्यात आले. घटनास्थळी तोडलेल्या ऊसात तपासणी करताना दोन सुरी व एक सतुर असे तीक्ष्ण हत्यार मिळून आले असून ही हत्यारे देखील फॉरन्सिक विभागाकडे हाताचे ठसे व रक्ताचे नमुने घेण्यासाठी पाठविण्यात आली आहेत. महिलेच्या खुना संदर्भात हत्यारे सापडल्याने पुरावा सापडला असला तरी महिलेच्या शरीराचा अर्धा भाग अद्यापही मिळून आला नाही.

संबधित आरोपीने हत्या अंधश्रध्देतून केली आहे की दिशाभुल करण्यासाठी असा दिखावा केला आहे की घातपाताचा प्रकार आहे याचा उलगडा पोलिसांना झाला नाही.तसेच अद्यापही सबंधित आरोपीही मिळाला नसल्याचे तपास सुरूच आहे.

error: Content is protected !!