फलटण प्रतिनिधी:- वाठार निं. ता. फलटण गावच्या हद्दीत वाठार फाटा या ठिकाणी दोन जर्शी गायीची व एक कालवड कत्तलीसाठी घेवुन जात असताना आढळून आल्या प्रकरणी दोन जणांच्या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 28/11/2024 रोजी सायंकाळी 5.40 वाजण्याच्या सुमारास वाठार निं. ता. फलटण गावच्या हद्दीत वाठार फाटा या ठिकाणी संशयित आरोपी 1) रोहित संजय निकाळजे (वय 21 वर्षे रा गिरवी ता फलटण) हा 2) इस्लाम हजी शेख (रा आलगुडेवाडी ता फलटण) यांच्या सांगण्यावरून त्याच्या मालकीची दोन जर्शी गायीची व एक कालवड स्वताचे कब्जात असताना चार चाकी टेम्पो क्रमांक MH-11AG-8319 यामध्ये दाटीवाटीने भरुन त्यांचे चारा पाण्याची कोणतीही सोय न करता व वैद्यकीय तपासणी न करता जणावरे वाहतुकीचा परवाना नसताना कत्तलीसाठी घेवुन जात असताना आढळून आला. सदर प्रकरणी शरद धनंजय गाडे ( रा. विडणी फलटण ता. फलटण) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रोहित संजय निकाळजे व इस्लाम हजी शेख यांच्या विरोधात फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलिस करत आहेत.