फलटण येथील दाम्पत्याने केली सात जणांची 1 कोटी 44 लाख रुपयांची फसवणूक

फलटण प्रतिनिधी :- मौजे निरगुडी तालुका फलटण येथील विकास बबन सस्ते व मनिषा विकास सस्ते या दाम्पत्याने त्यांच्या मित्रांना शेअर मार्केटमध्ये व डाळिंब खरेदी विक्री च्या व्यवसायामध्ये गुंतवणुक करण्याच्या नावाखाली तब्बल 1 कोटी 44 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शहर पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी कृष्णात वसंत जाधव ( मु.पो.आसु, ता. फलटण, जि. सातारा) यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी यांच्या शेजारी विकास बबन सस्ते हे त्यांचे कुटुंबासह राहत होते फेब्रुवारी 2022 मध्ये विकास बबन सस्ते व त्यांची पत्नी मनिषा विकास सस्ते या दोघांनी मिळुन फिर्यादी यांना आम्ही शेअर मार्केटमध्ये व डाळिंब खरेदी विक्री (राजलक्ष्मी इंटरप्रायजेस) च्या व्यवसायामध्ये गुंतवणुक करून त्यातुन चांगले पैसे मिळवुन तुम्हाला चांगला परतावा देवु असे सांगुन गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे प्रलोभन देवुन गुंतवणुक करण्यास सांगितलेने त्यांना तक्रारदार यांनी तुम्हाला पैसे देतो परंतु मला तुम्ही सिक्युरिटी म्हणुन काही तरी द्या असे सांगितले.

यावेळी विकास बबन सस्ते यानी त्याची पत्नी मनिषा विकास सस्ते यांनी तक्रारदार यांना त्यांचा मौजे जाधववाडी, ता. फलटण येथील प्लॉट दिनांक. 21/02/2022 रोजी नोटरी करारनामा करून फिर्यादी यांनी दिलेले 30 लाख रूपये परताव्यासह फिर्यादी यांना परत दिल्यानंतर त्यांचा खुशखरेदी करून दिलेला प्लॉट पुन्हा त्यांना दस्त फिरवुन देणेबाबत ठरले होते.

‌त्याप्रमाणे विकास बबन सस्ते यांना त्यांची पत्नी मनिषा सस्ते यांचे सांगणेवरून 30 लाख रूपये विकास बबन सस्ते यांचे राजलक्ष्मी इंटरप्रायजेस या कंपनिच्या बँक खात्यावर पाठविले होते, त्या बदल्यात त्यांनी फिर्यादी यांना दि. 14/02/2022 रोजी विकास बबन सस्ते यांची पत्नी मनिषा विकास सस्ते यांच्या नावावर असलेला जाधववाडी येथील प्लॉट नावावर करून दिला होता.

दि. 22/08/2022 रोजी फिर्यादी यांचे नातेवाईक व विकास बबन सस्ते यांचे मित्र दादा मल्हीरी मदने यांचे मध्यस्थीने विकास बबन सस्ते याने माझी व माझ्या पत्नीची सदरच्या प्लॉटवरून भांडणे चालु आहेत. तुम्ही माझ्या पत्नीचा सदरचा प्लॉट फिरवून तिचे नावे करून द्या मी तुम्हाला तुम्ही दिलेल्या रकमेच्या 4 टक्के दराने परतावा देतो अशी हमी दिल्याने फिर्यादी यांनी कोणत्याही प्रकारे मोबदला न घेता सदरचा प्लॉट दि. 22/08/2022 रोजी विकास बबन सस्ते यांची पत्नी मनिषा विकास सस्ते यांच्या नावावर करून दिला तसेच मी तुम्हाला अजुन गुंतवणुक करून चांगला परतावा देतो-असे सांगुन प्रलोभन देवुन फिर्यादी यांच्याकडून 6 लाख रूपये घेतले अशी एकूण रक्कम पैकी 36 लाख रूपये घेवुनही फिर्यादी यांना दिलेल्या रकमेवरती नोटरी करार नाम्याप्रमाणे व करारनाम्या प्रमाणे ठरलेली परताव्याची रक्कम व मी गुंतवलेली मुळ रक्कम त्यांनी परत केली नाही.

फिर्यादी यांनी सदरची रक्कम मागणी केली असता आज देतो, उद्या देतो, असे सांगुन रोज टोलवाटोलवी करून आज अखेर त्यांनी फिर्यादी यांना गुंतवलेली रक्कम परत दिली नाही.विकास बबन सस्ते व त्यांची पत्नी मनिषा विकास सस्ते यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करून त्यातुन चांगले पैसे मिळवुन तुम्हाला चांगला परतावा देवु असे सांगुन 1) गणेश वसंतराव जगदाळे (रा. महतपुरापेठ, मलठण, ता. फलटण, जि. सातारा) यांची एकुण 17 लाख 80 हजार रुपयांची 2) दिपक नामदेव जगदाळे (रा. राजलक्ष्मी अपार्टमेंट, फ्लॅट नं. 6, रामबाग, फलटण, ता. फलटण, जि. सातारा) यांची एकुण 15 लाख रुपयांची

3) संदिप भानुदास टोणगे (रा. सिध्दीविनायक अपार्टमेंट, फ्लॅट क्र. 13, रामबाग, फलटण, ता. फलटण, जि. सातारा) यांची एकुण 17 लाख 50 हजार रुपयांची 4) दयानंद श्रीरंग वाघमोडे (रा. निंभोरे, ता. फलटण, जि. सातारा) एकुण 3 लाख 63 हजार 650 रुपयांची 5) सचिन शामराव तावरे (रा. निरगुडी, ता. फलटण, जि. सातारा) यांना एकुण 46 लाख 28 हजार रुपयांची 6) धिरज चंद्रकांत जाधव (रा. साखरवाडी, ता. फलटण, जि. सातारा) 8 लाख रुपयांची आर्थिक फसवणुक केली आहे.

सर्व जणांची एकूण 1 कोटी 44 लाख 21 हजार 650 रुपयांची आर्थिक फसवणुक झाली असून विकास बबन सस्ते व मनिषा विकास सस्ते यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम करीत आहेत‌.

 विकास बबन सस्ते व मनिषा विकास सस्ते यांनी शेअर मार्केटमध्ये, जमीन खरेदी विक्री व डाळिंब खरेदी विक्री च्या व्यवसायामध्ये गुंतवणुक करण्याच्या नावाखाली अनेकांची लाखोंची फसवणूक केल्याची माहिती मिळत असून फसवणूक झालेल्या व्यक्तींनी याबाबत तक्रार असल्यास शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी असे आवाहनही शहर पोलीसांनी केले आहे.
error: Content is protected !!