गोखळी येथील दोन हार्डवेअर दुकानात 50 हजाराची चोरी

फलटण प्रतिनीधी:- मौजे गोखळी येथील दोन हार्डवेअर दुकानात अज्ञात चोरट्यांनी चोरी करून सुमारे 50 हजाराचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली असून याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात स्वतःच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार व फिर्यादी उदयसिंह आत्माराम घाडगे ( रा. गोखळी ता. फलटण) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, दि.27/11/2024 रोजी रात्री 8:30 ते दि.28/11/2024 रोजी सकाळी 6 याकालावधीत मौजे गोखळी येथील फिर्यादी यांच्या आकाश हार्डवेअर दुकानातील 2 हजार रुपये किंमतीची रबरी पाईप तीन बंडल, 15 हजार रुपये किंमतीची पीव्हीसी फिटींग मटेयिअलच्या सात पिशव्या, 1 हजार रुपये किंमतीची सात चौदा मापाची कॉपर वायर बंडल, 1 रुपये किंमतीची शितल कंपनीची 20 कुलपे असा एकूण 19 हजार रुपये किंमतीचा माल व शुभम बाळासाहेब गावडे यांच्या सर्वेश हार्डवेअर दुकानातील 15 हजार रुपये किंमतीची सात वावंन्न मापाची कॉपर वायर बंडल, 7 हजार 500 रुपये किंमतीची डीपी कॉपर तार 15 किलो ,2 हजार रुपये किंमतीची रबरी पाईप तीन बंडल, 1 हजार रुपये किंमतीची वेल्डींग कटींगचे ग्रॅन्डर, 2 हजार रुपये किंमतीची पक्कड, स्कु ड्रायव्हरचे बॉक्स, 2 हजार रुपये किंमतीची फरशी कटींग मशीन दोन,1 हजार रुपये किंमतीची अडजेस्टेबल पाना असा एकूण 30 हजार 500 रुपये किंमतीचा माल शेड दुकानाचा शटर वाकवून आत प्रवेश करुन अज्ञात चोरट्याने चोरी करून चोरून नेला. सदर दोन्ही चोरीच्या गुन्हा प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

error: Content is protected !!