फलटण – हॉकी इंडिया अंतर्गत हॉकी महाराष्ट्र यांच्या वतीने सब ज्युनियर महिलाचे पिंपरी चिंचवड येथील एस्ट्रोटर्फ मैदानावराती महाराष्ट्र संघाचे राष्ट्रीय स्पर्धा पूर्व प्रशिक्षण शिबिर आयोजन करण्यात आले होते. त्याकरिता दि हॉकी सातारा संघटनेच्या हॉकी खेळाडूचे सब ज्युनियर मध्ये कु.तेजस्विनी कर्वे कु. श्रेया चव्हाण कु. अनुष्का केंजळे कु.निकिता वेताळ अशा चार खेळाडूंची निवड झालेली होती. त्यातील कु.निकिता वेताळ व कु. तेजस्विनी कर्वे यांची सिकंदराबाद येथे होणाऱ्या सब ज्युनिअर महिला राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या हॉकी संघामध्ये निवड झालेली आहे.

सातारा जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रामध्ये आणखी एक मानचा तुरा रोवला गेल्याची माहिती दि हॉकी सातारा संघटनेचे सचिव तथा ज्येष्ठ हॉकी प्रशिक्षक तथा तालुका क्रिडा अधिकारी (नि.) महेश खुटाळे यांनी माहिती दिली. या सर्व खेळाडूंना दि हॉकी सातारा संघटनेचे सचिव तथा ज्येष्ठ हॉकी प्रशिक्षक महेश खुटाळे व हॉकी प्रशिक्षक सचिन धुमाळ प्रशिक्षण देत आहेत.तसेच प्रशिक्षणामध्ये सहाय्यक म्हणून बी.बी खुरंगे, सहाय्य करत आहेत.
सर्व प्रशिक्षक व खेळाडूंचे विधान परिषदेचे मा.सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य सुधीर अहिवळे व दि हॉकी सातारा संघटनेचे अध्यक्ष बाहुबली शहा, व इतर पदाधिकारी पंकज पवार, प्रवीण गाडे, विजय मोहिते,महेंद्र जाधव,सचिन लाळगे व माजी राष्ट्रीय खेळाडू शिरीष वेलणकर, सुजीत निंबाळकर यांनी अभिनंदन केले.