फलटण:- भाजप कोअर कमिटी बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून उद्या सायंकाळी मुख्यमंत्री पदाचा शपथविधी होणार असून यानिमित्ताने फलटण येथे आनंदोत्सव साजरा होणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी दिली.

भारतीय जनता पार्टीच्या फलटण शहरात प्रदेश, जिल्हा, मंडल पदाधिकारी, आघाड्या मोर्चे यांची प्रदेश, जिल्हा, मंडल, पदाधिकारी, बूथ प्रमुख, कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी आज दुपारी २ वाजता आनंदोत्सव साजरा करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे उपस्थित राहावे असे आवाहन भाजपचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी केले आहे.