फलटण : फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय फलटण यांच्यावतीने दि. २ जानेवारी ते दि. ६ जानेवारी २०२५ दरम्यान सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शन २०२५ चे आयोजन शेतीशाळा जिंती नाका फलटण येथे करण्यात आले असल्याची माहिती फलटण एज्युकेशन सोसायटी सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.
श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय या ठिकाणी आयोजित पत्रकार परिषदेत याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी प्राचार्य अरविंद निकम, प्राचार्य एस. डी. निंबाळकर व प्राचार्य यु. डी. चव्हाण उपस्थित होते.फलटण येथील श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शनात २०० पेक्षा अधिक कृषी क्षेत्राशी निगडित कंपन्यांचा सहभाग असून नामांकित, ट्रॅक्टर कंपन्या, शेतीची अवजारे, सेंद्रिय शेती, पशुधन, पशुसंवर्धन व संगोपन, डेअरी, पोल्ट्री, बीनपॉलिहाऊस, ठिबक, स्प्रिंकलर. पी. व्ही. सी. पाईप्स, कृषीपंप, बीज व रोपे, नर्सरी, सेंद्रिय शेती, गांडूळ व शेणखते, जैविक तंत्रज्ञान, कृषी उत्पन्न व अर्थसहाय्य कृषी उपयोगी पुस्तके, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान (एआय) यांची माहिती व तंत्रज्ञान प्रदर्शन या एकाच ठिकाणी शेतकर्यांना उपलब्ध होणार आहे.
कृषी प्रदर्शनामध्ये विविध विषयावर चर्चासत्राच्या आयोजन करण्यात आले आहे यामध्ये भविष्यातील शेती कृत्रिम बुद्धिमत्ता ए (आय टेक्नॉलॉजी) डॉक्टर विवेक भोईटे कृषी विज्ञान केंद्र बारामती, भरड धान्याचे आहारातील महत्त्व डॉक्टर प्रियदर्शनी देशमुख कृषी विज्ञान केंद्र कालवडे, कृषी उद्योजकता विकास डॉक्टर यु.डी चव्हाण प्राचार्य कृषी महाविद्यालय फलटण, शाश्वत दुग्ध व्यवसाय डॉक्टर शांताराम गायकवाड गोविंद फाउंडेशन फलटण या मान्यवरांचे शेतकऱ्यांना बहुमूल्य मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी या कृषी प्रदर्शन लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकाकडून करण्यात आले आहे.
पुढील वर्षी प्रत्यक्षात प्रात्यक्षिक करून शेतकऱ्यांना विविध पिकांची व फळभाज्या शेतकऱ्यांना पहावयास मिळणार असून दि. २ ते ६ जानेवारी २०२५ सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत कृषी प्रदर्शन करीता मोफत प्रवेश असून स्टॉल बुकिंग साठी ७५६४९०९०९१ व ९०९६३५५५४१ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले असून या कृषी प्रदर्शनाचे मॅनेजमेंट युटिलिटी इव्हेंट्स पुणे यांच्यामार्फत करण्यात आले आहे.