फलटण येथे क्रांतिसूर्य महात्मा फुले यांना मान्यवरांकडून अभिवादन

फलटण : स्त्रीशिक्षणाचे जनक, थोर समाज सुधारक व जातीभेदाविरोधात बंड पेटविणारे क्रांतिबा महात्मा जोतिराव फुले यांच्या १३४ व्या स्मृती दिना निमित्त येथील महात्मा फुले समता परिषद ,महात्मा फुले विचार मंच, महात्मा फुले जयंती उत्सव समिती व सावित्रीमाई जयंती उत्सव समिती यांच्या तर्फे क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांना फलटण येथील महात्मा फुले पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.
यावेळी फलटण शहरातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास माजी खासदार रणजितसिंह ना निंबाळकर, फलटण चे नवनिर्वाचित आमदार सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या ऍड जिजामाला ना निंबाळकर अमरसिंह ना निंबाळकर गोविंद भुजबळ, बापूराव शिंदे यांनी सकाळी अभिवादन केले तसेच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे ना निंबाळकर यांनी रणजित भुजबळ, दत्ता नाळे, टी. डी.शिंदे,अशोक शिंदे ,विवेक शिंदे, संकेत फरांदे,अंबादास दळवी, आशय अहिवळे या मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन केले.
बाळासाहेब अडसूळ, महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब ननावरे, जाधववाडीचे माजी सरपंच मुनिश जाधव महात्मा फुले समता परिषदेचे तालुका अध्यक्ष बापुराव शिंदे, प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन राजेंद्र बोराटे, दशरथ फुले, प्राचार्य सुधीर अहिवळे, प्रा नितीन जगताप, प्रा विशाल शिंदे, प्रा सोमनाथ माने, प्रा. संपतराव शिंदे, तुकाराम गायकवाड, कोळकीचे उपउपसरपंच विकास नाळे, जाधववाडी चे उपसरपंच राहुल शिंदे संदीप नेवसे , किरण राऊत,बंडू शिंदे, किरण दंडिले, अरविंद राऊत, यांच्या सह विविध सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी अभिवादन केले. महात्मा फुले यांना अभिवादन करण्यासाठी दिवसभर विविध मान्यवर महिला व युवकांनी उपस्थिती दर्शवली प्रबुद्ध विध्याभवन च्या सर्व विध्यार्थ्यांनी या वेळी महात्मा फुले याना सामूहिक अभिवादन केले.

error: Content is protected !!