मुधोजी महाविद्यालयास शिवाजी विद्यापीठ सातारा विभागीय कुस्ती स्पर्धेमध्ये फ्री स्टाईल क्रीडा प्रकारात सुवर्णपदक

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क

फलटण :- बाळासाहेब देसाई महाविद्यालय,पाटण येथे झालेल्या सातारा विभागीय कुस्ती पुरुष स्पर्धा, सन 2024-25 मध्ये फ्री स्टाईल क्रीडा प्रकारात पै.सुरज गोफणे 61कि.लो. वजन गटात सुवर्णपदक घेऊन प्रथम क्रमांकाच स्थान मिळवले तसेच या पैलवानाने उत्कृष्ट कुस्तीचे प्रदर्शन करून सर्व प्रेक्षकांची मने जिंकली.

फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर,संस्थेचे प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम सर,मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एच.कदम यांनी सर्व संघाचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!