फलटण :- इस्लामपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय १४ वर्षाखालील मुलींच्या हॉकी स्पर्धेत मुधोजी हायस्कूल, फलटणच्या संघाने कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करत नेत्रदीपक विजय मिळवला आहे. या संघाने सलग तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावून फलटण नगरीच्या इतिहासात मानाचा तुरा रोवला आहे.
या यशामध्ये १४ वर्षाखालील सर्व मुलींचा उत्साह, पालकांचे सहकार्य, आणि सिनियर खेळाडूंच्या प्रेरणादायी भूमिकेचा मोठा वाटा आहे. संघातील सर्व खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात आले आहेत.फलटणच्या मुधोजी हायस्कूलने खेळाच्या क्षेत्रात घवघवीत कामगिरी करत राज्य पातळीवर आपले स्थान प्रस्थापित केले आहे.संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक, व व्यवस्थापक यांच्या अथक मेहनतीमुळे हा विजय शक्य झाला.
फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, तसेच संस्थेचे प्रशासन अधिकारी अरविंद निकम मुधोजी हायस्कूलचे प्रार्चाय सुधीर अहिवळे यांनी संघाचे अभिनंदन केले आहे.