महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क
फलटण प्रतिनिधी:- फलटण नगरपरिषदेच्या होवू घातलेल्या निवडणूकीच्या अनुषंगाने फलटण शहर हे १३ प्रभागात विभागले असून फलटण नगरपरिषदेमध्ये २७ नगरसेवक असणार आहेत त्यामध्ये ५ नगरसेवक हे अनुसूचित जातीसाठी राखीव असणार आहेत तर एकूण १४ जागा ह्या महिलांसाठी राखीव करण्यात आलेल्या आहेत. नगरपरिषदेची लोकसंख्या ५२,११८ इतकी आहे. नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण खुल्या गटासाठी आरक्षित करण्यात आले आहे.
फलटण नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण सोडत दि ८ रोजी सकाळी ११ वाजता जाहीर करण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रियांका आंबेकर, तहसीलदार डॉ अभिजीत जाधव व नगर परिषद मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोडत कार्यक्रम नगर परिषदेच्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक भवनच्या पाठीमागे नव्याने झालेल्या हॉलमध्ये सभागृहात पार पडला.
यावेळी फलटण शहरातील प्रमुख राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरक्षण प्रसिद्ध करण्याचा दिनांक गुरुवार,दिनांक ९/१०/२०२५ असूनआरक्षण सोडतीच्या अनुषंगाने काही हरकती किंवा सूचना असल्यास त्या गुरुवार, दिनांक ९/१०/२०२५ ते मंगळवार, दिनांक १४/१०/२०२५ दुपारी ३ वाजेपर्यंत या कालावधीत मुख्याधिकारी यांच्याकडे फलटण नगरपरिषद कार्यालय, फलटण जि. सातारा येथे दाखल करता येतील.हरकती व सुचना दाखल करणाऱ्या नागरिकांना आवश्यक असल्यास सुनावणीकरीता उपस्थित राहणेसाठी स्वतंत्रपणे कळविणेत येईल. संबंधित विभागीय आयुक्त सदस्यपदांच्या आरक्षणास मान्यता देतील. आरक्षणाची अंतिम अधिसूचना १ जुलै २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
प्रभाग क्रमांक नुसार जाहीर करण्यात आलेले आरक्षण खालील प्रमाणे
प्रभाग क्रमांक १ (जागा अ , जागा ब ) आरक्षण सोडत – जागा अ -अनुसूचित जाती – महिलाजागा ब – सर्वसाधारण खुला
प्रभाग क्रमांक २ (जागा अ , जागा ब ) आरक्षण सोडत – ( जागा अ ) – अनुसूचित जाती – महिला( जागा ब ) – सर्वसाधारण खुला
प्रभाग क्रमांक ३ ( जागा अ , जागा ब ) आरक्षण सोडत – ( जागा अ ) – अनुसूचित जाती सर्वसाधारण ( जागा ब ) – सर्वसाधारण खुला – महिला
प्रभाग क्रमांक ४ ( जागा अ ,जागा ब ) आरक्षण सोडत – ( जागा अ ) – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला( जागा ब ) – सर्वसाधारण खुला
प्रभाग क्रमांक ५ ( जागा अ , जागा ब ) आरक्षण सोडत – ( जागा अ ) – अनुसूचित जाती – महिला ( जागा ब ) – सर्वसाधारण खुला
प्रभाग क्रमांक ६ ( जागा अ , जागा ब )आरक्षण सोडत – ( जागा अ ) – नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण ( जागा ब ) – सर्वसाधारण खुला – महिला
प्रभाग क्रमांक ७ (जागा अ ,जागा ब )आरक्षण सोडत- ( जागा अ ) – सर्वसाधारण खुला – महिला( जागा ब ) – सर्वसाधारण खुला
प्रभाग क्रमांक ८ ( जागा अ , जागा ब ) -आरक्षण सोडत- ( जागा अ ) – नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण ( जागा ब ) – सर्वसाधारण खुला – महिला
प्रभाग क्रमांक ९ ( जागा अ , जागा ब ) -आरक्षण सोडत – ( जागा अ ) – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला( जागा ब ) – सर्वसाधारण खुला
प्रभाग क्रमांक १० ( जागा अ , जागा ब ) – आरक्षण सोडत – ( जागा अ ) – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला( जागा ब ) – सर्वसाधारण खुला
प्रभाग क्रमांक ११ (जागा अ , जागा ब ) –आरक्षण सोडत – ( जागा अ ) – नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण ( जागा ब ) – सर्वसाधारण खुला – महिला
प्रभाग क्रमांक १२ ( जागा अ , जागा ब ) – आरक्षण सोडत – ( जागा अ ) – अनुसूचित जाती सर्वसाधारण (जागा ब ) – सर्वसाधारण खुला – महिला
प्रभाग क्रमांक १३ ( जागा अ , जागा ब , जागा क ) आरक्षण सोडत- ( जागा अ ) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ( जागा ब ) सर्वसाधारण खुला – महिला ( जागा क ) सर्वसाधारण खुला

