महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क
फलटण:- फलटण शहरातील मोकाट कुत्र्यांना पकडण्यासाठी काढण्यात आलेल्या ठेकेदार यांनी आजपासून शहरातील मोकाट कुत्री पकडण्यास सुरूवात केली असून मोकाट कुत्र्यांच्या टेंडर बाबत बातमी प्रसिद्ध होताच नगर परिषद कडून शहरातील मोकाट कुत्री पकडण्यास सुरूवात झाली.
फलटण नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने फलटण शहरातील मोकाट कुत्रे (श्वान) पकडण्याकरीता जाहिर निविदा खर्च मंजुरी ठराव क्रमांक प्रशासकिय सभा ठराव क्र. ४०२ दिनांक ४/१/२०२४ रोजी मंजुर करण्यात आले होते. फलटण नगरपरिषदेच्या आरोग्य विभाग व सबंधित ठेकेदार यांनी एकही शहरातील मोकाट कुत्रे (श्वान) अद्याप पकडले नसल्याने याबाबत सविस्तर बातमी प्रसिद्ध होताच मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी मोकाट कुत्रे (श्वान) पकडण्यासाठी आदेश दिले.
शहरात मोकाट कुत्र्याची दहशत झाली होती. दिनांक १०/१२/२०२४ रोजी पासून शहरातील मोकाट कुत्रे पकडण्यासाठी सुरवात झाल्याने शहरात मोकाट कुत्र्याचे प्रमाण नक्कीच कमी होणार आहे. कायम स्वरुपी मोकाट कुत्रे पकडण्याचे टेंडर चालू ठेवावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.